आरक्षणाला हजारो वर्षांची परंपरा-प्रा.कवाडे

0
10

नागपूर,दि.17ः- आरक्षणाला आपला विरोध का? आपण आपला विचार ठेवा, त्याला आम्ही उत्तर देऊ. मंदिरातल्या पुजार्‍याला आम्ही कधी विरोध केला नाही. साफ-सफाई करणारे हे दलितच आहे. त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. कारण शेकडो वर्षांची परंपरा आरक्षणाला आहे, हे असे विचार भिमसैनिक मेळाव्याच्या अध्यक्षीय भाषणात आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी जिल्हा भीम सैनिक मेळाव्यात व्यक्त केले.
मेळाव्याचे उद््घाटन राज्याचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केले. जयदीप कवाडे मुख्य पाहुणे व वैशालीताई ठाकूर स्वागताध्यक्ष म्हणून होत्या. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती प्रा. गोपीचंद ढोके नागपूर प्रदेश अध्यक्ष रत्नाकर, रत्नाकर मडके, अरुण गजभिये, नरेंद्र डोंगरे, संजय मेर्शाम, संजय बडोदेकर, अजय चव्हाण, संजय खांडेकर, चंद्रकांत पांडे, कैलास बोंबले, नरेश रक्षित, अनिल बांदरे हे होते.
प्रा. जोगेंद्र कवाडे पुढे बोलताना म्हणाले की, ‘ब्ल्यू व्हेल’ हा खेळ आताचा आहे. त्याच्यापेक्षा आमचा शेतकरी हजारो वर्षांपासून खेळत आहे. तीन वर्षांत आमच्या ९ हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. ते पुढे म्हणाले की ज्या आरक्षणामुळे दलित, गरीब, ओबीसी समाजाचे लोक सक्षम झाले त्याच आरक्षणाला आज हे सरकार विरोध करत आहे. हे सरकार नेहमी संविधान बदलविण्याची भाषा बोलत आहे, हे घातक असल्याचेही कवाडे यांचे म्हणणे आहे.
याप्रसंगी अनिल देशमुख यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून देशाला अखंड ठेवून आरक्षणाचा दुरुपयोग होत नाही. केंद्र व राज्य सरकार संविधान बदलविण्याची भाषा करीत आहे. त्या विरुद्ध लढा उभारण्याची गरज आहे, असे विचार मांडले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. गोपिचंद ढोके प्रास्ताविक नरेश डोंगरे तर आभार रत्नाकर मडके यांनी मांडले. यावेळी आरक्षण हा भाकरीचा प्रश्न नाही यावर प्रा. सतीश ढोके यांनी प्रोजेक्टरवर माहिती दिली. भिमेष भारती व संच यांनी बहारदार भिम गीताचा कार्यक्रम सादर केला. याप्रसंगी हजारो भिमसैनिक हजर होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मनोज बागडे, दीपक बागडे, नरेश रक्षीत, मोहित ढोके, शारदा ढोके, सागर ढोके, संभाजी सोनुले, दिनेश काचेवार, राजू अडागळे, नरेंद्र गायकवाड यांनी पर्शिम घेतले. कार्यक्रमाला हजारो भिमसैनिक उपस्थित होते.