आदर्श ग्रामविकासासाठी सरपंचांनी समोर यावे- मनोहरराव चंद्रिकापूरे यांचे आवाहन

0
14
 नवनियुक्त सरपंच,उपसरपंच व ग्रा.पं.सदस्यांचा सत्कार
अर्जुनी-मोर,दि.19: गाव हा विश्वाचा नकाशा आहे. गावावरून देशाची परिक्षा होते. राष्टसंत तुकडोजी महाराजांच्या विचारप्रेरणेंनी गावातील सरपंच व त्यांचे संवगडी उपसरपंच, ग्रा. पं. सदस्यांना विश्वासात घेवून स्वतचे गाव तिर्थ करावे. असे आवाहन प्रदेश राष्टवादी कॉग्रेसचे सदस्य तथा जिल्हा किसान आघाडीचे अध्यक्ष मनोहरराव चंद्रिकापूरे यांनी केले. ते अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार कार्यक्रमात बोलत बोलत होते.
येथील प्रसन्न सभागृहात नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं. सदस्यांच्या सत्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्वादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मनोहरराव चंद्रिकापूरे, माजी आमदार दिलीप बन्सोड,जि.प.चे गटनेते गंगाधर परशुरामकर, जि.प.सदस्या राजलक्ष्मी तुरकर,पं. स.सदस्य सुधीर साधवानी, तालुकाध्यक्ष नामदेव कापगते, युवक आघाडीचे अध्यक्ष योगेश नाकाडे,चित्रलेखा मिश्रा, माधुरी पिंपळकर,मंजुताई चंद्रिकापूरे, माजी जि.प.सदस्य रतीराम राणे, लोकपाल गहाणे, मनोहर शहारे, शालीकराम हातझाडे उपस्थित होते. यावेळी मागदर्शन करताना माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी सरपंच हा गावाचा कणा आहे. प्रत्येक पाऊल त्यांचे विकासाभिमुख असावे. हे सर्व काम करीत असताना कायद्याच्या चौकटीतून प्रवास  करून ग्रामसमृद्ध करावे. असे सांगितले. गंगाधर परशुरामकर यांनी ग्राम पंचायत अधिनियमाप्रमाणे वागणूक करून आपण सर्व सदस्यांना सोबत घ्यावे. पक्षभेद विसरून सर्वांची साथ घेवून प्रत्येक योजना राबवावी. असे सांगितले. तर राजलक्ष्मी तुरकर यांनी  पुरूषांच्या तुलनेत महिलासुद्धा बरोबरीने  आहेत. ग्राम पंचायतीपासून राजकारणाची सुरूवात करून पुढील राजकीय जिवनाची वाटचाल करण्याचे आवाहन केले. विनोद हरिणखेडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नवनियुक्त सरपंचांनी गावविकासाकडे लक्ष देवून रोजगार हमीतून गावविकास साधावा असे सांगितले. दरम्यान, यावेळी राष्ट्वादी कॉग्रेसच्या सरपंच,उपसरपंच व ग्रा.पं.सदस्याना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.प.सदस्य किशोर तरोणे यांनी केले. संचालन उद्धव मेहंदळे यांनी तर आभार गोवर्धन गहाणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंजि. हेमकृष्ण संग्रामे, दिपक सोनवाने,धनराज रहेले, आनंदराव बाळबुद्धे, भागवत मुंगमोळे, वैशाली राखडे, विकास रामटेके, गजानन कोवे, सरीता नंदेश्वर, हिरालाल शेंडे व इतरांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिकांनी हजेरी लावली होती.