वस्तीगृहाच्या स्टोररूमला भीषण अाग

0
10

चंद्रपूर,दि.19ः- येथील समाज कल्याण कार्यालयाचा परीसरात असलेल्या मुलांचा वस्तीगृहातील स्टोर रूमला आज सकाळी ११ वाजताचा दरम्यान भिषन आग लागल्याने एकच खळबळ उडाली.दरम्यान लगेच अग्निशमक विभागाला माहिती दिल्याने अग्निशमन विभागाच्या दोन गाड्यांनी ती आग आटोक्यात आणली.ही आग शार्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या आगीत सोलरपॅडसह इतर साहित्य जळून खाक झाले आहेत. चंद्रपूर शहरातील दुध डेअरी मार्गावर असलेल्या समाज कल्यान विभागाचा कार्यालयासह जात पडताळणी कार्यालय सुद्धा आहे. वस्तीगृहातील काही विद्यार्थ्यांच्या लक्षात स्टोररु्ममधून आग निघत असल्याचे लक्षात येताच त्यांनी व्यवस्थापकाला माहिती दिली.