डॉ. सुधीर भांडारकर यांचा संदर्भग्रंथ जर्मनीत प्रकाशित

0
7

देवरी,दि.19- स्थानिक मनोहर भाई पटेल विज्ञान महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक आणि प्राणिशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुधीर वेंकटराव भांडारकर यांचा संदर्भग्रंथ ‘स्पेसिस डायवर्सिटी अँड रिचनेस ऑफ बेंथोस इन फ्रेशवाटर लोटीक इकोसिस्टिम’ जर्मनी मधील लॅम्बर्ट अकॅडेमीक पब्लिशिंग यांनी प्रकाशित केला आहे.

डॉ. सुधीर भांडारकर हे प्राणिशास्त्र विभागात प्राध्यापक असून त्यांनी प्राणिशास्त्र याविषयात बरेच लिखाण केले आहे. त्यांनी अलीकडे ‘स्पेसिस डायवर्सिटी अँड रिचनेस ऑफ बेंथोस इन फ्रेशवाटर लोटीक इकोसिस्टिम’ या विषयावर संदर्भ ग्रंथ लिहिले. या संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन जर्मनी येथे करण्यात आले. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात अभिनंदन होत आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय  डॉ. वासुदेव भांडारकर, डॉ. देवेंद्र बिसेन, डॉ. गोपाल पालिवाल, डॉ. दिनेश तिडके, प्राचार्य डॉ. अरुण झिंगरे तसेच गोंदिया शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, कुटुंबीय व मित्र परिवार यांना दिले आहे. डॉ. भांडारकर लिखित हे तिसरे ग्रंथ प्रकाशित झाले असून जवळपास पन्नासावर शोध निबंध आंतरराष्ट्रीय युजीसी मान्यता प्राप्त नियतकालिकेतून प्रकाशित झाले आहेत. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.