डॉ.आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कारात आमगाव,कोरंभीटोला व जमाकुडो प्रथम

0
44

प्राथमिक आरोग्य केंद्र अनुक्रमे कोरंभीटोला,चोपा व बिजेपार

प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अनुक्रमे जमाकुडो,लाखेगाव व हिरडामाली

आमगाव ग्रामीण रुग्णालय प्रथम

गोंदिया,दि.22: महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने माता व बालकांच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट काम करणाèया संस्था व व्यक्तिकरिता डॉ.आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार योजना २०१७-१८ या वर्षाकरिता आयोजित करण्यात आली होती. या योजनेत जिलह्यातील तिरोडा उपजिल्हा रुग्णालय व आमगाव ग्रामीण रुग्णालयासह एकोडी, इंदोरा बुज., चोपा, पांढरी, कोरंभीटोला, मुल्ला व बिजेपार हे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच आसोली, लाखेगाव, हिरडामाली, परसोडी, निमगाव, सेरपार व जमाकुडो या उपकेंद्रांनी सहभाग नोंदविला होता.
त्यामध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोरंभीटोला प्राथमिक आरोग्य केंद्रांला प्रथम क्रमांक तर गोरेगाव तालुक्यातील आरोग्य केंद्र चोपा द्वितीय व सालेकसा तालुक्यातील बिजेपार केंद्राला तृतीय क्रमांक मिळाला.त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात प्रथम क्रमांक सालेकसा तालुक्यातील जमाकुडो,द्वितीय क्रमांक तिरोडा तालुक्यातील लाखेगाव व तृतीय क्रमांक गोरेगाव तालुक्यातील हिरडामालीला देण्यात आले.तर ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय गटामध्ये आमगाव ग्रामीण रुग्णालयाला जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक देण्यात आले आहे.
जिल्हा स्तरावर ७ प्राथमिक आरोग्य केंद्रातून पहिल्या तीन आरोग्य केंद्राची व उपकेंद्राची तर उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयातून एकाची पुरस्कारासाठी तपासणी करण्यात आली. या आरोग्य संस्थांची तपासणी करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीने १३, १४ व १७, १८ नोव्हेंबरला आरोग्य संस्थांना भेटी देऊन पाहणी केली. या समितीचे अध्यक्ष जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रqवद्र ठाकरे, सदस्य सचिव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शाम निमगडे, सदस्यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, आरोग्य सभापती पी.जी. कटरे, महिला व बाल कल्याण सभापती विमल नागपुरे, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी प्रा.एच.एच.पारधी, पत्रकार प्रतिनिधी खेमेंद्र कटरे, सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी डॉ. सतीश जायस्वाल यांचा समावेश होता. या समितीने सर्वच आरोग्य केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. यामध्ये आरोग्य केंद्र, उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचे मुख्यालयातील वासतव्य, त्या आरोग्य केंद्रात झालेल्या प्रसुतीची संख्या, त्यात एएनएम व वैद्यकीय अधिकारी यांनी केलेली प्रसुती, कुटूंब कल्यान शस्त्रक्रियेसाठी केलेल्या कामाचा आढावा, लहान बालकांना देण्यात येणाèया अ जीवन सत्वांच्या लसीकरणाची माहिती, हिवताप व क्षयरोग नियंत्रण राबविण्यात आरोग्य संस्थांचा सहभाग, नाविण्यापूर्ण योजनेत केलेले कार्य, जननी सुरक्षा योजनेचा लाभाथ्र्यांना दिलेला लाभ, सॅम व मॅम बालकांवर विशेष लक्ष देऊन सर्व साधारण श्रेणीत आणने, कुपोषित बालकांची टक्केवारी कमी करने, शस्त्रक्रिया कक्ष व प्रसुती कक्षातील साहित्याची ठेवण आणि वापर त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी, लाभार्थी व रुग्णांच्या आरोग्य संस्थाबद्दल असलेले मत या सर्व मुद्यांवर तपासणी समितीने पाहणी केली.
सोबतच आरोग्य संस्थांनी या सर्व कामाची नोंद असलेले रजिस्टरची पाहणी केली. रुग्णालयमधील जैविक कचèयाची विल्हेवाट व रुग्णवाहिकेची स्थिती, रात्रीच्यावेळी रुग्णांना देण्यात येणाèया सेवांसह औषध प्रयोगशाळा, आरोग्य शिबिर आणि आरोग्य केंद्राच्या बळकटीकरणात नागरिकांचा सहभाग कसा होता. या सर्व गोष्टीची पाहणी समितीने केली. त्यानंतर पहिल्या तीन आरोग्य केंद्र व उपकेंद्राची गुणानुक्रमे निवड केली.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोरंभीटोला प्राथमिक आरोग्य केंद्र हे शेवटच्या टोकावर असलेले आणि आरोग्य केंद्रातील लगतच्या सहा गावात कुठलेचे खासगी डॉक्टर नसल्याने परिसरातील जनतेचा या आरोग्य केंद्रावरच विश्वास दिसून आला.
त्याचप्रमाणे देवरी तालुक्यातील जमाकुडो प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हे पूर्णत: आदिवासी भागातील जनतेसाठी असून बारा टोल्यांची ४ हजार ४२ लोकसंख्या या आरोग्य उपकेंद्रांतर्गत येत आहे. हे आरोग्य उपकेंद्र आदिवासी भागातील जनतेला उपचारासाठी महत्वाचे ठरले असून रात्री-बेरात्रीला मिळत असलेल्या सेवेमुळे हिवतापासारख्या रोगावरही नियंत्रण आणण्यात यश आले आहे.