एड्सबाधितांना आपुलकीने मदत करा-ठाकरे

0
3

गोंदिया,दि.02 : एड्स हा जिवघेणा आजार आहे. यापासून बचावासाठी जनतेत जनजागृती आवश्यक आहे. एड्सबाधीतांना समाजात हिन भावनाने बघितले जाते. तेही समाजातीलच असल्याने त्यांना आपुलकीच्या भावनेतून मदत करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले.
येथील के.टी.एस.जिल्हा रूग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्तवतीने आयोजीत जागतिक एड्स दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रूखमोडे, डॉ.अमरिश मोहबे, डॉ.अनील परियाल, डॉ. धीरज लांबट, डॉ. प्रदीप कांबळे,डॉ. ऋषी सोनी उपस्थित होते.
याप्रसंगी ठाकरे यांनी, शासनाच्या आरोग्य विषयक योजना जनसामान्यांपर्यंत कशा प्रकारे पोहचविल्या जाईल व त्यांना चांगले आरोग्य कसे देता येईल यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपस्थित अन्य पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले. दरम्यान एड्स दिनानिमित्त आयोजीत जनजागृती रॅलीला ठाकरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. प्रास्तावीक आयसीटीसीचे जिल्हा पर्यवेक्षक संजय जेनेकर यांनी मांडले. संचालन समुपदेशक प्रकाश बोपचे यांनी केले. कार्यक्रमासाठी भरती धनविजय, कविता गायधने, प्रवीण इंदूरकर, ललिता शरणागत, अपर्णा जाधव, तृप्ती बाजपेई, माहेश्वरी चव्हाण, सुनीता शरणागत, भारत मोहबंशी, महेंद्र नाकाडे, कांचन दुबे, कमलेश्वरी परिहार, रेखा बोहरे, निलेश राणे, विनोद बंसोड आदिंनी सहकार्य केले.