भूमिअभिलेख कार्यालयाची धुरा ८ कर्मचार्‍यांच्या खांद्यावर

0
15

लाखांदूर,दि.03ः- ८९ गावांचा समावेश असलेल्या लाखांदुर तालुक्यातील भूमि अभिलेख कार्यालयात २१ आस्थापना संख्या मान्यता असताना या कार्यालयाची धुरा केवळ ८ कर्मचार्‍यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे पी-१, नक्कल, नकाशा यासारखे महत्त्वाचे दाखले, प्रमाणपत्र रितसर अर्ज सादर संबंधित कार्यालयात करूनही अर्जदारांना मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून लाखांदूरला सदर कार्यालयात विविध कामासाठी तसेच विाविध प्रमाणपत्रासाठी मिळण्यासाठी येणार्‍या शेतकरी, नागरिकांना आर्थिक, शारिरीक व मानसिक नाहक त्रास सहन करावा लागत आहे.शासनाने तात्काळ लक्ष देऊन रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
या कार्यालयात प्रमुख ४ कर्मचार्‍यांची पदे रिक्त असून त्यात कनिष्ठ लिपीक १ पद, छाननी लिपीक १ पद, भूमापक १ पद, शिपाई १ पद, निमतादार १ पद रिक्त आहे. निलंबित असल्यामुळे कार्यालय उपअधीक्षक १ पद रिक्त आहे. आवक- जावक लिपीक प्रतिनियुक्तीवर २ वर्षापासून जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्याचे सांगण्यात आले. भूमि अभिलेख कार्यालय हे शासनाचे कार्यालय असून शेतकरी, नागरिकांच्या दृष्टीने भूमि अभिलेख कार्यालय अत्यंत महत्त्वाचे असून शेतकरी, नागरिकांकडून सदर कार्यालयास लाखो रुपयांचा महसूल प्राप्त होतो. या कार्यालयात जमिन मोजणी, शेती संबंधी फेरफार, पी- १ , पी-२ नक्क या कार्यालयातून केली जातात. सदर कार्यालात अर्जकरून शासकीय फिस भरूनही पी- १ नक्कल, नकाशा तयार करणारे लिपीक कर्मचारी कार्यालयात नसल्याने अर्जदार शेतकरी, नागरिकांना आर्थिक भुर्दंडासह मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शासनाच्या उदासीन, दुर्लक्षित धोरणांचा फटका अर्जदारांना बसत असून याकडे त्वरित लक्ष देऊन सदर कार्यालयात कर्मचार्‍यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, अशी मागणी शेतकरी, नागरिकांकडून केली जात आहे.