गोरेगावच्या सर्व प्रभागात बोरवेल निर्मिती

0
10

गोरेगाव,दि. 4 -गोरेगाव नगर पंचायतच्या वतीने उन्हाळ्यात पाणी समस्या येऊ नये म्हणून बोरवेलचे खोदकाम करण्यात येत आहे. प्रभाग क्र. १४ मध्ये बोरवेलचे भूमिपूजन नगर उपाध्यक्ष इजि. आशिष बारेवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक राजू टेंभुर्णीकर, राजू मेर्शाम, मुकेश टेंभुर्णीकर, मनोज शहारे, करण जैन प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी कालपासून सुरू असलेल्या बोरवेलचे सर्व १९ प्रभागातील काम न.प. उपाध्यक्ष इजी. आशिष बारेवार यांनी आपल्या निदर्शनात करवून घेतले. नगरातील १ ते २ बोरवेल ला पाणी न आल्याने पुढे त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. याचा निर्णय घेण्यात येईल, असे मत आशिष बारेवार यांनी व्ये केले. नगरात न.पं. च्या या कामासाठी हर्षोल्हास व्यक्त करण्यात येत आहे. बोरवेलचे कामासाठी आशिष बारेवार यांनी रात्रदिवस एक करून सर्व कामे पार पाडल्याने त्यांचे नगरात कौतुक केले जात आहे.