अखेर मुख्यमंत्र्यांनी केली यशवंत सिन्हांशी चर्चा

0
9

अकोला,दि.६़. शेतकरी समस्या व त्यांच्या प्रश्नांना घेऊन भाजप नेते व माजी केंद्रिय मंत्री यशवंत सिन्हा यांनी  अकोला पोलीस मैदानात सुरू केलेेल्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घ्यावी लागली आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार बच्चू कडू मार्फत यशवंत सिन्हा यांच्याशी मोबाईलवर बोलणी करुन सायकांळी ४ वाजेपर्यंत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.सिन्हा यांच्या आंदोलनाची दखल सरकारला घ्यावी लागली आहे.आजच्या घडामोडीत मात्र खासदार नाना पटोले कुठेच दिसून आले नाही उलट बच्चू कडू यांची शिष्टाई कामी आल्याचे दिसून आले.

यशवंत सिन्हा, भंडाºयाचे खासदार नाना पटोले, अचलपूरचे आमदार बच्च कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर या आयात नेतृत्वाने गेल्या तीन दिवसांपासून प्रशासनासह शासनाचही दमछाक केली असल्याने स्थानिक नेतृत्वाला मोठा धडा मिळाला आहे.केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात शेतकरी जागर मंचाने येथील पोलिस मुख्यालयात सुरु केलेल्या आंदोलनास बुधवारी तिसºया दिवशी व्यापक स्वरुपात पाठिंबा मिळत आहे. बुधवारी दुपारी अनेक गावांच्या शेतकºयांनी आंदोलन स्थळाला भेटी देण्यास सकाळपासूनच सुरुवात केली. शेकापचे प्रदिप देशमुख, अ. भा. छावाचे रणजीत काळे, छावा संघटनेचे शंकर वाकोडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह आंदोलनस्थळी दाखल होऊन आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला. भोकरदनचे जिल्हा परिषद सदस्य केशव पाटील जवंजाळ, मुंबईचे उद्योजक एकनाथ दुधे यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळी आंदोलनात सहभागी होत आहेत.यशवंत सिन्हांच्या आंदोलनास आता राष्ट्रीय स्तरावरूनही पाठिंबा मिळत आहे. तृणमुल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी हे देखील दुपारच्या सुमारास आंदोलनस्थळी भेट देऊन सिन्हा यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे.