घोटी येथे शुक्रवारपासून ज्ञानयज्ञ सप्ताह 

0
7
गोरेगाव,दि.१९ -जवळच्या घोटी येथे गावकरी व सतसंगी मंडळाच्या वतीने श्री.१००८ महर्षि मुक्तांनद स्वामी यांच्या पुण्यतीथी निमीत्त शुक्रवार २२ डिसेंबरपासून सात दिवसीय श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
घोटी येथील हनुमान मंदिरांच्या प्रांगणात हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून दरदिवशी सकाळी ९ ते १२ व दुपारी २ ते सायं. ५ या कालावधीत श्री.१००८ महर्षि मुक्तांनद स्वामी यांचे शिष्य पं. कृपाशंकर  मिश्र उपाध्यायपूर (उ. प्र.) हे कथा वाचन करणार आहेत. तत्पूर्वी २२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता शोभायात्रा काढून ज्योत प्रज्वलित करण्यात येणार असून त्यानंतर दुपारी १२ वाजतापर्यंत प्रवचन करण्यात येणार आहे. दरदिवशी पसायदान, सामूहिक आरती, आदी कार्यक्रम विधवत पारपडणार असून सायंकाळच्या सुमारास  किर्तनाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शेवटच्या दिवशी २८ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता हवन यज्ञ व दुपारी १२ वाजता दहिकाला व महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष जोशीराम रहांगडाले, संतोष नागनाथे, शोभेलाल येडे, भाऊलाल पटले, सुकचंद रहांगडाले, सुरजलाल शरणागत, घनश्याम रहांगडाले परिश्रम घेत आहेत. दरम्यान सात दिवस चालणाèया या ज्ञानयज्ञ सप्ताहमुळे संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून या कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आयोजकांनी केले आहे.