लोहारा येथे सेवानिवृत्तांचा नागरी सत्कार

0
10

छाया- सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रावण खोटेले यांचा सत्कार करताना सावन डोये आणि प्रा.मेश्राम (छाया- सृष्टी भदाडे, देवरी)

देवरी- लोहारा येथील मित्र मंडळाच्या वतीने परिसरातील सर्व सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा नागरी सत्कार नुकताच करण्यात आला.
तालुक्यातील लोहारा येथे एका नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने हा योग साधण्यात आला. या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी चारभाटाचे दिलीप श्रीवास्तव हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार सावन डोेये, बेरार टाईम्सचे सहसंपादक सुरेश भदाडे, सिद्धार्थ विद्यालयाचे प्राचार्य महेंद्र मेश्राम, इंजि. जगताप, भोजराज घासले, प्रेमानंद उके, संजय मानकर, सीताराम सराटे, प्रभा परिहार, प्रदीप परिहार, रवींद्र श्रीवास्तव, मडावी, राजेश राऊत,प्रा. वसंत साखरे, डॉ. पवार, अनिल गोखले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुल्ला आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले डॉ. आनंद कुकडे, मुख्याध्यापक चैतराम मेश्राम, श्रावण खोटेले,वसंत शुक्ला, शिशुपालसिंह पवार, उदाराम राहुलकर, येशूदास सवाईकर, खुशालसिंह परिहार,भगवानप्रसाद मिश्रा, बाबूराव घोरमारे, जगदीशसिंह पवार, तेजराम नंदेश्वर, बुधराम डोंगरे, निर्मला डोंगरे, बाबूसिंह बघेल, बळिरामसिंह सोमवंशी, विठ्ठलराव खुरपुडे, श्रीमती बनसोड, राजूभाऊ चौधरी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्याचे संचलन निनावे गुरुजी,लोहारा यांनी केले.