दिशाभूल करणार्‍या नेत्यांपासून जनतेने सावध रहावे – ना.बडोले

0
21

तिरोडा,दि.27ः-माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिन सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. हे आमचे भाग्य असून जनतेची दिशाभूल करणार्‍या नेत्यापासून जनतेने सावध रहावे, तसेच राज्यातील सर्व योग्य शेतकर्‍यांना कर्जमुक्ती देऊन ज्यांची ज्या शेतकर्‍यांचे किडीमुळे नुकसान झाले. अशा सर्व शेतकर्‍यांना योग्य तो मोबदला देण्याचे काम राज्याचे मुख्यमंत्री इमानदारीने केले आहे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. ते तिरोडा येथे आमदार  विजय रहांगडाले यांनी आयोजित केलेल्या सुशासन दिवस कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.  तिरोडा येथील सुशासन दिन कार्यक्रम व सरपंच मेळावा तसेच सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद््घाटन आमदार डॉ.परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, खोमेश्‍वर रहांगडाले, सिताबाई रहांगडाले, उमाकांत होरोडे, कृउबास सभापती चिंतामन रहांगडाले, उपसभापती विजय डिंकवार, तिरोडा न.प. उपाध्यक्ष सुनील पालांदुरकर, विश्‍वजीत डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक आ. विजय रहांगडाले यांनी अटलबिहारी वाजपेयी यांनी दाखविलेले पंचायत राज योजनेचे योग्य ते पालन करून गावाचा विकास करण्याचा स्वप्न साकार व्हावे म्हणून आज आम्ही येथे सुशासन दिनानिमित्त संपूर्ण क्षेत्रातील सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार व मेळावा आयोजित केला आहे.
यात कोणतेही राजकारणाचा भाग नसून माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या सुराज्याचे स्वप्न साकार व्हावे म्हणून मी दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करीत असतो व या क्षेत्रातील जनता या कार्यक्रमास मोठय़ा प्रमाणात हजेरी लावत असल्याने मी या सर्व जनतेचे अभिनंदन करतो, असे उद्गार काढले.कार्यक्रमाचे संचालन माजी जि.प. उपाध्यक्ष मदनभाऊ पटले यांनी तर आभार नगराध्यक्षा सोनाली देशपांडे यांनी मानले. या कार्यक्रमाकरिता सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व तिरोडा-गोरेगाव क्षेत्रातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.