साखराजवळ ट्रॅव्हल्स उलटली,प्रवासी जखमी

0
9

यवतमाळ,दि.27 : वणी येथून पांढरकवडाकडे येणारी भरधाव ट्रॅव्हल्स राष्टीय महामार्गावरील साखरा जवळ उलटली. या अपघातात एका महिलेसह तीन प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारला सायकांळी ४.१५ वाजताच्या सुमारास घडली.
वणी येथून करंजी-पांढरकवडा मार्गे यवतमाळकडे जाणारी ट्रॅव्हल्स (क्र.एम.एच-२९-एम-८१४२) राष्टीय महामार्ग क्र. ७ ने पांढरकवडाकडे येत होती. साखरा गावाजवळील उड्डान पुलाजवळील मोठे खड्डे चुकविताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे भरधाव ट्रॅव्हल्स रस्त्याच्याकडेला उलटली. या अपघातात तीन प्रवासी गंभीर जखमी तर सात प्रवासी किरकोळ जखमी झाले. गंभीर जखमींमध्ये रामचंद्र दिगांबर किनाके (५२), रा. रंगनाथ वणी, संजय रामसिंग जाधव (४०) रा. शिवणी ता. घाटंजी आणि आश्विनी विलास नंदनवार (३१) रा. राजूर कॉलरी ता. वणी यांचा समावेश आहे. जखमींना उमरी येथील ख्रिश्चन दवाखान्यात दाखल करण्यात आले.
या अपघाताची माहिती मिळताच करंजी महामार्ग पोलीस केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक अरुण पुंड व सहकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळावरील नागरिकांच्या सहकार्याने जखमी प्रवाशांना ट्रॅव्हल्समधून बाहेर व उमरीच्या रुग्णालयात दाखल केले.