कार्यक्रमांमधून समाजाला दिशा मिळते-शिशुपाल पटले

0
9

तुमसर,दि.02ः-थोर पुरूषांची जयंती,पुण्यतिथी साजरी करणे हा केवळ उत्सव नसतो तर अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजाला एक दिशा मिळत असते,आयोजकांनी हा हेतू पुढे ठेवूनच अशा कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे,असे मत माजी खासदार शिशुपाल पटले यांनी व्यक्त केले. तुमसर तालुक्यातील गोंदेखारी येथे आयोजित पोवार राजभोज जयंती उत्सवात पटले बोलत होते. रविवार ३१ डिसेंबर रोजी जि.प.शाळा गोंदेखारी येथे समाज मेळावा व राजाभोज जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ते पुढे म्हणाले, मी सदैव समाज संघटनेच्या पाठीशी उभा राहिलो आहे. समाज संघटनेला,समाजाच्या विकासासाठी जे -जे करणे शक्य असेल ते मी करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि माझी जी मदत हवी असेल ती करण्यास मी कटीबध्द असून ते मी माझे कर्तव्य समजतो असे शिशुपाल पटले यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा किसान गर्जना संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पटले यांच्या हस्ते करण्यात आले. माजी खासदार शिशुपाल पटले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुने मुरलीधर टेंभरे, अमृत पटले, सुरेश राहांगडाले, माजी जि.प.उपाध्यक्ष रमेश पारधी, कृ.उ.बा.स. संचालक अशोक पटले,जि.प.सदस्य प्रेरणा तुरकर, पं.स.सदस्य सुप्रीया राहांगडाले, डॉ. जितुभाऊ तुरकर, टेमनीच्या सरपंच पमुबाई भगत, देवसर्रा सरपंच कंचन कटरे, मांगलीचे सरपंच प्रभाकर पारधी, देवरीदेवचे सरपंच विनोद पटले, अनिल राहांगडाले, विठ्ठल बोपचे, मंजू बोपचे, गोवर्धन शेंडे, फकीरचंद बिसने, भाऊजी राणे, राजेंद्र भोयर, विजय बोपचे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.