श्रमदान हीच खरी राष्ट्रसेवा-डहाट

0
29

गोरेगाव,दि.03 : प्रत्येकाने स्वावलंबीपणे आपले जीवन जगले पाहिजे. यासाठी श्रमाची गरज असून श्रमदारन हीच खरी राष्ट्रसेवा असल्याचे प्रतिपादन तहसीलदार कल्याण डहाट यांनी केले.
राष्ट्संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत येथील जगत कला-वाणिज्य व इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालयाच्यावतीने तालुक्यातील ग्राम सोनी येथे आयोजीत राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या समारोप कार्यक्रमात रविवारी (दि.३१) ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. निळकंठ लंजे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ.एस.एच. भैरम, गटशिक्षणाधिकारी यशवंत कावळे, शिक्षण विस्तार अधिकारी मालाधारी, भाऊलाल गौतम, सरपंच उषा वलथरे, मुख्याध्यापक राजेंद्र पटले उपस्थित होते.
याप्रसंगी प्राचार्य लंजे यांनी, स्वच्छ भारत, समृद्ध भारत घडवायचा असेल तर सर्वप्रथम सुरुवात स्वत:पासून करायला पाहिजे. याची प्रचिती राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणून देतात असे मत व्यक्त केले. दरम्यान कार्यक्रमाला उपस्थित अन्य पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले. या शिबिरातून हागणदारी मुक्त ग्राम, ग्राम स्वच्छता, सांड पाण्याचे व्यवस्थापन, जल साक्षरता, सांस्कृतीक कार्यक्रम इत्यादी उपक्रम राबविण्यात आले. अहवाल वाचन डॉ.सी.एम. राणे यांनी केले. संचालन प्रा.लोकेश कटरे यांनी केले. आभार डॉ. छाया पटले यांनी मानले. शिबिरासाठी प्रा.जे.बी. बघेले, डॉ.सी.एस. राणे, शिबिर सहायक डॉ. सी.पी. पटले, प्रा. योगीता बघेले यांच्यासह सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांनी सहकार्य केले.