बॉम्बशोधक व श्वान पथककडून बाब कंम्बलपोष दर्गांची तपासणी

0
13

आर्णी ,दि ५ – शहरात अरूणावती नदीच्या काठी बाबा कंबलपोष यांचा उर्स सुरू झाला असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. त्या दुष्टीकोणातुन यवतमाळ येथील बॉम्बशोधक व श्वानपथक पथकाचे सात चमु दाखल झाले असून या परिसराची तपासणी केली.
आर्णी डिसेंबर महिण्यात अरूणावती नदीच्या पात्रात एका लोंखडी पेठीत बॉम्ब आणी जिवंत काडतुस सापडल्याची घटना उघडीस आली होती. त्यामुळे शहरासह तालुक्यात विविध चर्चेला उधान आले होते. मात्र काल पासुन आर्णीत बाबा कंबलपोष यांची यात्रा सुरू झाली. या यात्रेत जिल्ह्यातील लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोणातून बॉम्बशोधक व श्वानपथकच्या चमुने दुपारी दरम्यान बाबा कंबलपोष दर्गा, यात्रेचा परिसर, बस स्थानक, आर्णी शहरातील महत्वाच्या जागी तपासणी केली. या दरम्यान काही आढळुन आले नसल्याचे त्यांच्या कडून सांगण्यात आले. ज्या ठिकाणी लाखो नागरिक एकत्र येत असतात त्या ठिकाणी बॉम्बशोधक व श्वानपथकाचे चमु तपासणी करत असतात. आर्णीत डिसेंबर महिण्यात बॉम्ब व काडतुस सापडले असले तरी त्या घटने सोबत आज झालेल्या तपासणीचे काही संबंध नाही अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक राजकिरण मडावी यांनी दिली.