देसाईगंज येथे ७२ घरकूल लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण

0
13

देसाईगंज : देसाईगंज नगर पालिकेंतर्गत विविध विकास कामांचे लोकार्पण, ५४ गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकासह सत्कार गुरूवारी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव महाराज यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी रमाई घरकूल योजनेंतर्गत ७२ लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण तसेच आयएचएसडीपी योजनेतून धनादेशाचे वाटप मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले.
देसाईगंज नगर पालिकेच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव महाराज होते. तर कार्यक्रमाचे उद््घाटन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. क्रिष्णा गजबे, नगराध्यक्ष शाम उईके, भाजप जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, अरविंद पोरेड्डीवार, न.प. उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, भाजचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, भाजपच्या महिला आघाडी अध्यक्ष शालू दंडवते, न.प. सभापती विलास साळवे, आबीद अली, आशा राऊत, जि.प. सदस्य प्रशांत वाघरे, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष निर्मला मडके, राजू जेठाणी, उपविभागीय अधिकारी एम. ए. राऊत, तहसीलदार अजय चरडे, मनोज खोब्रागडे, कुरूणा गणवीर, मुरलीधर सुंदरकर, सदानंद कुथे, राम लांजेवार, सुनिता ठेंगरी, निलोफर शेख आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी केले. तर संचालन प्रा. o्रीराम गहाणे यांनी केले. मंत्र्यांनी देसाईगंज येथे सायंकाळी दीक्षाभूमीलाही भेट दिली