पत्रकारदिनी पत्रकारांची आरोग्य तपासणी

0
20

गोंदिया,दि.15ः-गोंदिया जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने पत्रकारदिनी शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात ३४ पत्रकारांची निशुल्क तपासणी करण्यात आली. यात स्वस्थ पत्रकार म्हणून अँड.विरेंद्र जायस्वाल, खेमेंद्र कटरे, हरिष मोटघरे यांना पृरस्कृत करण्यात आले.तपासणीनंतर वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ.अपुर्व पावडे यांच्या उपस्थितीत स्वस्थ पत्रकारांना पुरस्कृत करण्यात आले.
या आरोग्य तपासणी शिबीरात एॅड.विरेंद्र जायस्वाल, प्रा. एच.एच.पारधी, उदय चक्रधर,खेमेंद्र कटरे,संजय राऊत,महेंद्र बिसेन, हिदायत शेख, गोपाल अग्रवाल,भरत घासले,सुब्रत पाल, बबलू महारवाडे, हरिष मोटघरे, राजेश बन्सोड, दिलीप लिल्हारे, राजेंद्रसिंह राजकुमार, दत्तात्रय दलाल, आशिक महिलावार, विकास बोरकर, रवि सपाटे, श्रीकांत व्यवहारे व आमगाव, शेडा, सडक अजुर्नी, तिरोडा, आमगाव येथील पत्रकारांची ब्लड, एक्सरे, ई.सी.जी. डायबिटीज, हृदयरोग, डोळे, कान व सोनोग्रॉफी टेस्ट आदी आधुनिक मशिनीद्वारे करण्यात आले. शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे डॉ. संजय येडे, डॉ.संजय माहुर्ले, डॉ. कोबे, डॉ. डगवार, डॉ. मोहित गजभिये, डॉ. विनोद खंडाईत, यांनी पत्रकारांची आरोग्य तपासणी केली.कार्यक्रमाचे संचालन राजेश बन्सोड यांनी केले. तर आभार सुब्रत पॉल यांनी मानले.