अध्यक्षपदी सीमा मडावी तर अल्तापभाई उपाध्यक्ष ?

0
12

राष्ट्रवादीकडून श्रीमती मडावी अध्यक्षपदासाठी तर परशुरामकरांचा उपाध्यक्षपदासाठी अर्ज

काँग्रेसकडून सीमा मडावी अध्यक्षपदासाठी रमेश अंबुले उपाध्यक्षसाठी अर्ज

 

गोंदिया,दि.15ः- जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज सोमवारी (दि. १५) होत असून भाजकडून अध्यक्षपदासाठी तिरोडा तालुक्यातील रजनी कुंभरे व उपाध्यक्ष पदासाठी चिचगडचे सदस्य हमीत अल्ताफ अकबरअली यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.गेल्याअडीच वर्षासाठी भाजप काँग्रेसची युती होती.मात्र आज उमेदवारी अर्ज दाखल होईपर्यंत भाजप-काँग्रेस युतीवर शिक्कामोर्तंब झालेले नव्हते.परंतु आत्ताच बेरार टाईम्सच्या हाती आलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसने अध्यक्षपदासाठी सुनिता मडावी यांचा तर उपाध्यक्षपदासाठी गंगाधर परशुरामकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.तर काँग्रेसकडून सीमा मडावी अध्यक्ष पदासाठी व रमेश अंबुले यांनी उपाध्यक्षसाठी अर्ज दाखल केला आहे मुंबईतील सुत्रांच्या माहितीनुसार भाजप-काँग्रेसची जुनीच युती कायम राहणार असून भाजपच्या एका मोठ्या नेत्यांने गोंदियातील एका नेत्याला जास्त गडबड करु नका असा संदेश दिल्याच्या चर्चेंने वेग घेतला आहे.काँग्रेसकडे अध्यक्ष व भाजपचा उपाध्यक्ष हे समीकरण पक्के होणार असे चित्र सध्या दिसून येत आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादीची युती होण्याची शक्यता मात्र कमी आहे.काँग्रेसने आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या निवासस्थानी श्रीमीत सीमा मडावी व माधुरी कुंभरे यांचे बोलावणे आले असून यापैकी कुणाचा फार्म अध्यक्षपदासाठी भरला जातो याकडे लक्ष लागले आहे.विशेष म्हणजे काँग्रेस,भाजप,राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच सदस्यांचे भ्रमणध्वनी बंद करुन ठेवण्यात आले आहेत.भाजपने आपल्या सदस्यांना घेऊन बस नागपूरवरुन गोंदियाकडे रवाना केली असून या बसमध्ये आजी माजी आमदार व खासदारांना सोबत ठेवण्यात आले आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक खासदार प्रफुल पटेल यांच्या रामनगर बगीचा निवासस्थानी सुरु आहे.या बैठकीत राष्ट्रवादीची महत्वाचा निर्णय घेणार आहे.