22.7 C
Gondiā
Thursday, July 23, 2026
Home विदर्भ गोवारींना अनुसूचित जमातीचे प्रमाण द्या

गोवारींना अनुसूचित जमातीचे प्रमाण द्या

0
31

चंद्रपूर,दि.18ः-येथील आदिवासी गोवारी मिशन देवरीला सग्नल असणार्‍या आदिवासी गोवारी संघर्षकृती समिती गोंडवानाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय सत्याग्रह करण्यात आला. आदिवासी गोवारी जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी घेवून हे आंदोलन विदर्भातील सर्व जिल्ह्यात करण्यात आल्याची माहिती जिल्हा संघटक गजानन कोहळे यांनी दिली.
चंद्रपूर येथे झालेल्या आंदोलनात प्रामुख्याने विजय राऊत,नानाजी ठाकरे, पत्रुजी नागोसे, शंकर नेवारे,केशव सोनवने,वसंता नागोसे, नागनाथ नेवारे, सुभाष राऊत, मारोती ठाकूर यांचेसह शेकडो आदिवासी गोवारी बांधवानी सहभाग घेतला. गोवारी जमातीला केंद्रशासनाच्या पत्रानुसार अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे. मध्यप्रदेशच्या अनुसूचित जमातीच्या यादीत गोवारी जमातीचा समावेश करण्याची मागणी माजी आमदार नारायणसिंह उईके यांनी लावून धरली होती.
काका साहेब कालेलकर कमिशन यांच्या शिफारसीने त्यावेळी गोंड गोवारी अशी संयुक्त नोंद झाली. परंतु महाराष्ट्र राज्य वेगळे झाल्यानंतर ही गोड गोवारी अशी संयुक्त नोंद तशीच ठेवण्यात आली. यानंतर अनेक वेळा शासनाकडे या संदर्भात तक्रारी करण्यात आल्या परंतु शासनाकडे याकडे लक्ष पुरविले नाही. त्यामुळे आदिवसी गोवारी बांधवांनी आज एक दिवसीय सत्याग्रह आंदोलन करून मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. या निवेदनात आदिवासी गोवारी समाजाने आपल्या मागण्या रेटून धरलेल्या असतांना २00६ मधील वसंत पाटील सहसंचालक यांनी गोवारी जमातीबाबत सादर केलेला अहवाल तत्काळ दुरूस्त करावा,गोवारी जमातीच्या व्यक्तींना केंद्र शासनाच्या पत्रानुसार अनुसूचित जमातीच्या सवलती द्याव्या,१९७६ च्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती सुधारीत आदेशातील महाराष्ट्राच्या अनुसूचित जमातीच्या यादीतील क्रमांक १८ वरील गोंड-गोवारी यामध्ये कॉमा टाकून दुरूस्ती शिफारस केंद्र सरकार करण्यात यावी, टाटा समाज विज्ञान समाज विज्ञान मुंबई यांचेकडून गोवारी समाजाचे केले जाणारे संशोधन व संवेक्षण रद्द करण्यात यावे या प्रमुख मागण्याचा यात समावेश आहे. उपरोक्त मागण्या मंजूर न झाल्यास पूढे तिव्र आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी गोवारी संघर्ष कृती समितीने दिला आहे.

 

 

blank