गणखैरा येथील रेल्वे पुलाचे काम बंद

0
8

गोेरेगाव,दि.18 :- गोंदिया – चंद्रपूर रेल्वे मार्ग वर ग्रामीण नागरिकांचे विरोध असूनही दक्षिण मध्य रेल्वे विभाग ने पुलाचे काम गणखैर रेल्वे फाटक वर सुरू केले होते. या कामाला स्थगितीसाठी सरपंच आणि नागरिकांनी आंदोलन करून सदर पुलाचे काम बंद करण्याची मागणी केली होती. मात्र यावर लक्ष दिले नाही, म्हणून नागरिकांनी विधान परिषद सदस्य डॉ.परिणय फुके व आमदार विजय रहांगडाले आणि अभिमन्यू काळे यांच्याकडे तक्रार केली.त्यानंतर गणखैरा येथील  पुलाच्या ठिकाणी पोचून चर्चा केली. यावेळी या क्षेत्रातील सरपंच व नागरीक उपस्थित होते. त्यानंतर आमदार रहांगडाले आणि जिल्हाधिकारी काले यांच्या आदेशाने सदर पुलाचे काम बंद करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य पुष्पराज जनबंधु, जिल्हा परिषद सदस्या रोहिणी वरखडे, गणखैरा ग्राम पंचायत सरपंच धारा तूप्पट, सटवा ग्राम पंचायत सरपंच विनोद पारधी, चिंचगाव सरपंच वैशाली तुरकर आदी उपस्थित होते.
रेल्वे विभागाच्या वतीने ज्या पद्धतीने गणखैरा रेल्वे फाटक पुलियाचे काम सुरू आहे, ती पध्दत आवगमान करणाऱ्या प्रवासीयांसाठी घातक होऊ शकते. चुकीच्या पद्धतीने या पुलाचे काम होत असुम सामान्य नागरीकांना याचा त्रास भोगावा लागेल म्हणून पुलाच्या कामाला बंद करण्यात आले व तसेच लवकरच या विषयावर संबंधीत अधिकाऱ्यांशी चर्चा होणार आहे अशी माहिती यावेळी आमदार विजय रहांगडाले यांनी दिली आहे.