पोलीस स्टेशनमध्ये असणारे युवक घटना स्थळी कसे?- राहुलदेव मनवर

0
20
आकाश पडघन
 वाशिम दि:18 – देशात अनेक सामाजिक व राजकीय आंदोलने होतात. त्यावर शासन प्रशासना कडून नामनात्र कारवाई केली जाते. भीमा कोरेगाव दगड फेकी नंतर अंबेडकरी जनतेने वाशीम जिह्यात कोणतीही अनुचीत घटना न घडू देता शासन प्रशासना समोर आपला रोष व्यक्त केला. मात्र जिल्हा पोलीस प्रशासना अंतर्गत येणाऱ्या मंगरूळपीर पोलिसांनी शेलू येथील अंबेडकरी युवकाला काही विशिष्ट लोकांकडून मरणावस्था येईपर्यंत मार तर खाऊ दिलाच, मात्र “बंद” दरम्यान पुढाकार घेतलेल्या काही युवकावर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सुद्धा खोटे गुन्हे दाखल केले. त्यामुळे इंजिनियर प्रवीण इंगळे व इतर काही जाणांविरुद्ध दाखल केलेले खोटे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुलदेव मनवर यांनी प्रसीद्धी पत्रकाद्वारे केली.
     प्रसीद्धी पत्रकात ते पुढे म्हणालेत की, मंगरूळपीर पोलिसांनी ३ जानेवारीच्या या दरोडा व विनयभंगाच्या बनावट घटनेसंदर्भातील एफ.आय.आर.मधे एका हाँटेलमधील घटना दुपारची असल्याचा उल्लेख असतांना पत्रकारांना घटना रात्रीची असल्याची खोटी माहीती देवून इंगळे व सदर युवकांची मोठी बदनामी करण्यासाठी ज्या प्रमाणे माहीती पुरविली, त्याचप्रमाणे सदरच्या न घडलेल्या घटनेत  अंबेडकरवादी इंजिनियर प्रवीण इंगळेच्या नावासह इतर आरोपीची नावे ही स्वतःहून घुसवली असल्याचे निदर्शनास येत आहे. कारण इंजिनियर प्रवीण इंगळे व त्याचे मित्र एफ.आय.आर मधील घटनेत उल्लेखीत वेळेस, पेडगाव येथील आंबेडकरी युवकास मारहाण झाल्या संदर्भात पोलीस स्टेशन मध्येच उपस्थित होते. याच्या नोंदी सुद्धा पोलीस स्टेशनच्या सीसी टीव्ही कॉमेरात असाव्यात असे म्हटले. तसेच एरव्ही इतर घटनामध्ये एफ.आय.आर दाखल करण्यास ५ ते १५ दिवस लावणाऱ्या पोलिसांनी पेडगाव येथील युवकास झालेल्या मारहाणीचा एफ.आय.आर. च्या नंतर कुठलीही चौकशी न करता ३तारखेच्या कथीत घटनेचा एफ आय आर ६तारखेला दाखल केला. यातच सर्व काही गुढ असल्याचे मनवर म्हणाले. त्यामुळे सदर एफ.आय.आर मधील प्रवीण इंगळे व इतर युवकांवर दाखल केलेले ३२३ , ३५४,A ३९५, ५०४, ५०६ गुन्हे त्वरित मागे घ्यावे अशी मागणी मनवर यांनी केली.
     त्याचबरोबर अलिकडच्या काही अॅक्ट्रासीटीच्या गुन्ह्यांसंदर्भात अनुसुचीत जाती – जमातीच्या नगरिकांना उद्देशून मनवर म्हणाले की, आपण या प्रकरणातील दाखल खोट्या गुन्हाबाबत आपल्या भावना जिल्हाभर व्यक्त करीत आहोत. कारण याचा त्रास निर्दोष युवकांना व त्यांच्या कुंटुंबाला मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे आपण सुद्धा राजकीय द्वेषापोटी अथवा पैशाच्या लोभापाई कुणावरही अॅक्ट्रासीटीचे खोटे गुन्हे दाखल करू नयेत, होवू नयेत याची नागरिकांनी व अन्यायाविरोधात काम करतो म्हनण्याची शेखी मिरविणाऱ्या कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी असे मत व्यक्त केले. त्याचबरोबर जेथे खरोखरच अन्याय होत असेल तेथे सदरहू अन्यायग्रस्त बहुजन समाज पक्षाकडे आल्यास वेळ पडल्यास त्याचा प्रश्न संसदेत मांडून अन्यायग्रस्तास सनदशीर मार्गाने न्याय मिळवून देवू असे ते म्हणाले.