पालकमंत्री बडोले आज जिल्ह्यात

0
9

गोंदिया,दि.२१ : पालकमंत्री राजकुमार बडोले हे आज २१ जानेवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. सकाळी १०.३० वाजता सडक/अर्जुनी येथून नवेगावबांधकडे प्रयाण. सकाळी ११ वाजता नवेगावबांध संकुल येथील मुलांचे बगीच्याचे भूमीपूजन. सकाळी ११.३० वाजता नवेगावबांध येथून अर्जुनी/मोरगावकडे प्रयाण व दुपारी १२ वाजता तहसिल कार्यालय अर्जुनी/मोर येथे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप. दुपारी १.३० वाजता अर्जुनी/मोरगाव येथून सडक/अर्जुनीकडे प्रयाण. दुपारी २ वाजता सडक/अर्जुनी येथील मस्जीदजवळ अल्पसंख्यांक निधीतून मस्जीदीच्या संरक्षण भिंतीचे व रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन करतील. दुपारी २.३० वाजता सडक/अर्जुनी येथून रेंगेपारकडे प्रयाण. दुपारी ३ वाजता रेंगेपार येथे बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. दुपारी ४ वाजता रेंगेपार येथून सडक/अर्जुनी मार्गे नागपूरकडे प्रयाण करतील.