राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने इंदिरा गांधी चौकात धरणे आंदोलन

0
7

गडचिरोली(अशोक दुर्गम)दि.२२ः– गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने विविध मागण्यांना घेऊन आज सोमवारला इंदिरा गांधी चौकात एकदिवसीय धरणे आंदोलन करुन मागण्याचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फेत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.निवेदनात गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करणे,महिला व बालरुग्णालय त्वरीत सुरु करणे,अल्पसंख्याक समाजाला ५ टक्के आरक्षण लागू करणे.विद्याथ्र्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम त्वरीत अदा करणे.गॅस,पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी करणे त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे १९ टक्के आरक्षण पुर्ववत करणे आदी मागण्यांचा समावेश होता.निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने यांना देण्यात आले.त्यावेळी जिल्हा उपाध्यक्ष फहीमभाई काझी,महिला अध्यक्ष सोनाली वि.पुण्यपवार,अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष मुस्ताफ अ.गणि शेख,विजय कावळे,शहाबुद्दीने पठाण,प्रभाकर बारापात्रे,जगन जांभुळकर आदी उपस्थित होते.