गणखैराच्या अंगणवाडीला एलएडीसंच भेट

0
12

गोरेगाव,दि.25ः- स्वच्छतामय संक्रांत-हळदीकुंकू कार्यक्रम अंतर्गत तालुक्यातील गणखैरा येथे अंगणवाडी केंद्राला एलएडी टिव्ही संच पाहुण्यांचे हस्ते भेटस्वरुपात देण्यात आले.त्या आधी सांस्कृतीक कलानिकेतन व महिला बचत गटाच्या महिलांनी पथनाट्य सादर करुन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.स्वखर्चाने शौचालय तयार करणार्या महिलांचा सत्कार मुख्य कार्यकारी अधिकारी एम.राजा दयानिधी यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष हामिद अल्ताफ अकबर अली,मुख्य कार्यकारी अधिकारी डा.एम.राजा दयानिधी , जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती छायाताई दसरे, जि.प.सदस्य विश्वजीत डोंगरे,जिल्हा परिषद सदस्य रोहिणी वरखडे,पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुकाअ राजेश राठोड, उपमुकाअ पारखे, पंचायत समिती सदस्य पुष्पराज जनबंधू, गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे, माजी सभापती पंचायत समिती दिलीप चौधरी,चित्रकला चौधरी,आरती चवारे,माजी पंचायत समिती उपसभापती सुरेंद्र बिसेन, बालविकास प्रकल्प अधिकारी वाघ, सरपंच सौ. धाराताई तुप्पट,सरपंच त्रिवेणी शरणागत,पर्यवेक्षीका अनीता श्रीवास्तव ,उपसरपंच लिखन पारधी व सर्व ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन आंगणवाडी सेविका प्रतीमा पारधी तर आभार सचिव संतोष परमार यांनी केले.कार्यक्रमाच्या यशश्वीतेसाठी रेखा रामटेके,शोभा जांभुळकर, पुष्पा कांबळे, दयावती तुप्पट , दिपीका कापसे, हेमलता दाणी, आशा कांबळे,दुर्गा कांबळे,अनुसया दाणी, अरूणा आदमने, प्रमीला बन्सोड,सीमा कांबळे,वंदना धमगाये ,जिरणबाई राऊत,छाया सरजारे व महिलांनी अथक परिश्रम घेतले.