अहेरी येथील पत्रकार रंगय्या रेपाकवार यांचे निधन

0
13

आलापल्ली,दि.30 : अहेरी येथील युवा पत्रकार, विदर्भ न्यूज एक्सप्रेसचे जिल्हा प्रतिनिधी तसेच दैनिक पुण्यनगरीचे अहेरी तालुका प्रतिनिधी रंगय्या रेपाकवार यांचे वर्धा जिल्ह्यातील सावंगी येथील रूग्णालयात  २९ जानेवारी रोजी दुःखद निधन झाले. पत्रकार रंगय्या रेपाकवार हे मागिल काही दिवसांपासून आजारी होते.