समाजाला संघटित होण्याची गरज-आ.पुराम

0
17

सालेकसा,दि.01 : आपला देश विविधतेने नटला आहे. विविध जाती-धर्माचे लोक येथे राहतात. समाजातील लोकांचा विकास करण्यासाठी समाज बांधवांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आपापसात सहकार्य व प्रेम भावना निर्माण करण्यासाठी संघटित होणे आवश्यक आहे. त्यासाठी तेली समाजानेसुद्धा संघटित व्हावे, असे उद्गार तेली समाज मेळाव्याप्रसंगी आ. संजय पुराम यांनी काढले.विदर्भ तेली समाज महासंघ आमगावच्या वतीने आदर्श विद्यालयात रविवारी तेली समाज मेळावा व विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आला. या वेळी ते मार्गदर्शन करीत होते.
उद्घाटन आ. संजय पुराम यांच्या हस्ते, ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष बी.एम. करमकर यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून आयएएस मिशन अमरावतीचे संचालक नरेशचंद्र काथोले, नागपूरचे तेली समाज संशोधक डॉ. महेंद्र धावडे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. केशव मानकर, शिवाजी संकुलचे संचालक झामसिंग येरणे, पं.स. सदस्य जसवंत बावणकर, प्रा. सुभाष आकरे, प्राचार्य सागर काटेखाये, कालीमाटीचे लिलाधर गिºहेपुंजे, शंकरराव क्षीरसागर, श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव सुकचंद येरणे, स्वागताध्यक्ष भास्कर येरणे, प्रा. किशोर निखाडे, डॉ. बावणकर, भेलावे, प्रेम भेलावे उपस्थित होते.तेली समाजाचे आराध्य दैवत संताजी जगनाडे महाराज यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.दरम्यान विद्यार्थ्यांसाठी रांगोली, भावगीत, नृत्य आदी स्पर्धा घेण्यात आल्या. विविध गीतांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेकरिता करावयाची तयारी, या विषयावर नरेशचंद्र काथोले यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, नेमके अभ्यासाचे तंत्र कसे विकसित करावे याबाबत मार्गदर्शन केले. दिवसेंदिवस सामाजिक व राजकीय परिस्थिती बदलत असून ओबीसींनी संघटित होवून आपल्या हक्कासाठी व आरक्षणासाठी लढा देण्याची गरज असल्याचे मत प्रा. धावडे यांनी व्यक्त केले.
दरम्यान तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी तसेच स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थी व अनेक गावांतील नवनियुक्त सरपंच यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. पोलीस विभागातील जयंत हुकरे यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आला. पाहुण्यांचे स्वागत स्वागताध्यक्ष भास्कर येरणे यांनी केले.
प्रास्ताविक आमगाव शाखेचे तालुकाध्यक्ष सोमेश्वर पडोळे यांनी मांडले. संचालन प्रा. भेलावे यांनी केले. आभार कुवरलाल कुरंजेकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी किशोर निखाडे, राजीव वंजारी, जानकीप्रसाद हटवार, विजय भुसारी, भाऊराव हटवार, जगदीश बडवाईक, जयंत उखरे, महेश वैद्य, आनंद येरणे, गोवर्धन वैरागडे, रामकृष्ण भेलावे, घनशाम साठवणे, प्रा. जिभकाटे, मनोहर बावनकर, उमेश आगाशे व तेली समाजाच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.