भाजपाकडून जनसामान्यांच्या भावनांचा अनादर

0
10

बाला बच्चन : काँग्रेस कार्यकर्त्यांचा दोन ठिकाणी पार पडला मेळावा

चंद्रपूर : राज्यात महायुतीचे सरकार येऊन चार महिने झाले. निवडणुकीदरम्यान भाजपाने जनतेला अनेक आश्वासने दिले. मात्र त्याची पूर्तता विद्यमान केंद्र व राज्य सरकारला करता आली नाही. आता मात्र भाजपाकडून जनसामान्यांच्या भावनाचा अनादर होत असल्याची टीका अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव बाला बच्चन यांनी केली.

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्ह्यातील काँग्रेस प्रणित कार्यकर्त्यांचा मेळावा गांधी चौक येथील कार्यालयाच्या प्रांगणात शनिवारला आयोजित करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव राहुल पुगलिया, महासचिव प्रविण पडवेकर, माजी आमदार बाबुराव वाघमारे, अ‍ॅड. अविनाश ठावरी, बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोहर पाऊणकर, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, विनोद अहिरकर, चंद्रकांत गोहोकर, दिलीप माकोडे, वसंत मांढरे, बल्लारपूरच्या नगराध्यक्ष छाया मडावी, अनिता कथडे यांची उपस्थिती होती. यावेळी नरेश पुगलिया यांनीही मार्गदर्शन केले.

दरम्यान, दुसरा कार्यकर्त्यांचा मेळावा येथील जनता महाविद्यालयाच्या सभागृहात घेण्यात आला. यावेळी राजुराचे माजी आमदार सुभाष धोटे, सुभाषसिंह गौर, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष नंदू नागरकर, ग्रामीणचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, शिवा राव, कुणाल चहारे, (नगर प्रतिनिधी)