रिक्त पदांमुळे प्रशासन लुळे-जिल्हाभरात २ हजार ४१३ पदे रिक्त

0
26

गडचिरोली : जिल्ह्यातील शासकीय कार्यालयाच्या ७२ आस्थापनेमध्ये अ, ब, क आणि ड गटाचे मिळून एकूण २ हजार ४१३ पदे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. यामुळे प्रशासकीय कामकाजाची गती मंदावली असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेंतर्गत एकूण ९७५ पदे मंजूर आहेत. यापैकी ८५८ पदे भरण्यात आली असून ११७ पदे रिक्त आहे. रिक्त पदांमध्ये गट अ चे १२, गट ब चे १०, गट क चे ९०, गट ड च्या ५ पदांचा समावेश आहे.

अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात एकूण २५८ पदे मंजूर आहेत. यापैकी १६४ पदे भरण्यात आली असून ९४ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये गट ब चे सहा, गट क चे ६७ व गट ड च्या २१ पदांचा समावेश आहे. जिल्हा परिषद कार्यालयात एकूण ८ हजार ७१४ पदे मंजूर आहेत. यापैकी ८ हजार २२० पदे भरण्यात आली असून ४९४ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये गट अ चे ७४, गट ब चे ३५, गट क चे ३६३ व गट ड च्या २२ पदांचा समावेश आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालयात एकूण ६ हजार ११७ पदे मंजूर आहेत. यापैकी ५ हजार ९५४ पदे भरण्यात आली असून १६३ पदे रिक्त आहेत. सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता कार्यालयात ५ पदे रिक्त आहेत. जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयात सहा पदे रिक्त आहेत. यामध्ये गट क चे पाच व गट ड च्या एका पदाचा समावेश आहे.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एकूण १९ पदे मंजूर आहेत. यापैकी १५ पदे भरण्यात आली असून चार पदे रिक्त आहेत. प्रकल्प संचालक (आत्मा) कार्यालयात ३६ पदे मंजूर आहेत. यापैकी २६ पदे भरण्यात आली असून १० पदे रिक्त आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या आस्थापनेवरील जिल्हा सामान्य रूग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयात एकूण ७७७ पदे मंजूर आहेत. यापैकी ५६८ पदे भरण्यात आली असून २०९ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये गट अ चे १९, गट ब चे १२, गट क चे ११० व गट ड च्या ६८ पदांचा समावेश आहे. जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयात एकूण १९५ पदे मंजूर आहेत. यापैकी १२४ पदे भरण्यात आली असून ७१ पदे रिक्त आहेत. जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयात ३१ पदे मंजूर यापैकी २२ पदे भरण्यात आली असून ९ पदे रिक्त आहे. आरोग्य सेवेतील (कुष्ठरोग) संचालक कार्यालया पाच पदे रिक्त आहे. हत्तीरोग अधिकारी कार्यालयाच्या गडचिरोली पथकात एकूण ९९ पदे मंजूर आहेत. यापैकी ७५ पदे भरण्यात आली असून २४४ पदे रिक्त आहे. रिक्त पदांमध्ये गट क चे चार, गट ड चे १९ व गट ब च्या एका पदाचा समावेश आहे. हत्तीरोग अधिकारी कार्यालयाच्या धानोरा पथकात एकूण ७६ पदे मंजूर आहेत. यापैकी ४८ पदे भरण्यात आली असून गट क व गट ड चे मिळून २८ पदे रिक्त आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्रमांक १ च्या कार्यालयात एकूण १२ पदे रिक्त आहेत. कार्यकारी अभियंता क्रमांक २ च्या कार्यालयात ८ पदे रिक्त आहेत. आलापल्लीच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ९ पदे रिक्त आहेत. कार्यकारी अभियंता मार्ग प्रकल्प कार्यालयात ११ पदे रिक्त आहेत. सिरोंचा येथील विशेष प्रकल्प कार्यालयात १४ पदे रिक्त आहेत. गडचिरोली वनवृत्त कार्यालयात ८ पदे रिक्त आहेत. गडचिरोली वन विभागाच्या उपवनसंरक्षक कार्यालयात आठ, वडसा उपवसंरक्षक कार्यालयात सहा, आलापल्ली उपवनसंरक्षक कार्यालयात ३९, सिरोंचा उपवनसंरक्षक कार्यालयात २९, भामरागड उपवनसंरक्षक कार्यालयात १७ पदे रिक्त आहेत. सामाजिक वनिकरण विभागात सहा पदे रिक्त आहे. आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात १७२ पदे रिक्त आहेत. अहेरी प्रकल्प कार्यालयात ११३ तर भामरागड प्रकल्प कार्यालयात १४१ पदे रिक्त आहेत. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी कार्यालयात १६ पदे रिक्त आहेत. गडचिरोली पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात १९ पदे रिक्त आहेत. उपायुक्त जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयात २१ पदे रिक्त आहेत. वडसाच्या वळूमाता प्रक्षेत्र कार्यालयात १२ पदे रिक्त आहेत. जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयात ११ पदे तर सहायक विक्रीकर आयुक्त कार्यालयात १० पदे रिक्त आहेत. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालयात ४२ पदे रिक्त आहेत.