काँग्रेसचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार-सचिव बाला बच्चन

0
10

नागपूर : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाला बळकट करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी त्यांनी देशभरातील २०० तज्ज्ञ नेत्यांशी चर्चा करून ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. कॉंग्रेसचे सचिव बाला बच्चन यांनी रविवारी देवडिया काँग्रेस भवन येथे आयोजित कार्यक र्त्यांच्या बैठकीत ही माहिती दिली. अध्यक्षस्थानी शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे होते.

हा अ‍ॅक्शन प्लॅन अंमलात आणण्यापूर्वी त्यावर पक्षाचे पदाधिकारी व कार्यक र्त्यांची मते व सूचना विचारात घ्याव्या, अशी भूमिका पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांची आहे. योग्य सूचनांचा यात समावेश केला जाईल. यासाठी प्रदेश, जिल्हा व तालुका स्तरावर बैठकांचे आयोजन केले असल्याची माहिती बच्चन यांनी दिली.

पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. अ.भा.काँगे्रस कमिटीच्या कार्यक्रमानुसार नियोजन करण्यात आले आहे. यातून बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे विकास ठाकरे यांनी सांगितले. पक्षाने दिलेल्या पदाचा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासोबतच पक्ष संघटनेसाठी मदत होते की नाही. याचाही विचार केला व्हावा. पक्षाची आचारसंहिता सर्वांनाच पाळावी लागेल, असे मत त्यांनी मांडले.

पक्षाच्या विविध पातळीवरील पदाधिकारी निवडण्याचे व स्थानिक निवडणुकीत आघाडीचे अधिकारी शहर काँग्रेस कमिटीला द्यावे, अशी सूचना माजी मंत्री नितीन राऊ त यांनी मांडली. युवक काँग्रेस हा पक्षाचा कणा आहे. यात निवडणुकीची पद्धती बंद करावी, असे मत माजी मंत्री अनिस अहमद यांनी मांडले.

प्रदेश काँग्रेसचे सचिव मुन्ना ओझा यांनी पक्षाच्या कार्यक्रमाची माहिती दिली. यावर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पक्षाची विचारसरणी, नेतृत्व, संघटनेत बदल, जाहीरनामा, पक्षाची बांधणी, शिस्त व जबाबदारी अशा १४ मुद्यावर मते व सूचना मांडण्याचे आवाहन त्यांनी केले. राहुल गांधी यांनी देशभरातील युवक काँग्रेसच्या कार्यक र्त्यांशी चर्चा करण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी असा दौरा करावा, अशी सूचना अतुल कोटेचा यांनी मांडली.

विधानसभा व लोकसभा निवडणुकीतील पराभामुळे खचून न जाता कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आंदोलनाची भूमिका घ्यावी, असे आवाहन प्रफुल्ल गुडधे यांनी केले.

उमाकांत अग्निहोत्री, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके, जयंत लुटे, तानाजी वनवे, संजय दुधे, दीपक कापसे, विजय बाभरे, अभिजित वंजारी, शेख हुसैन, सुरेश पिल्लेवार, इब्राहीम चुडीवाले आदींनी मनोज साबळे आदींनी विचार मांडले. यावेळी माजी आमदार यादवराव देवगडे, अरुण डवरे व्यासपीठावर होते. डॉ. गजराज हटवार यांनी संचालन केले.