तंटामुक्त गाव समिती एकोडीने केले महात्मा गांधींना अभिवादन

0
13

एकोडी/गोंदिया,दि.02ः- महात्मा गांधी यांची ७० वी पुण्यतिथी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती एकोडी तर्फे ग्राम पंचायत कार्यालय येथे महात्मा गांधींच्या फोटोला माल्यार्पण करून साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रविकुमार पटले होते. पटले म्हणाले की महात्मा गांधीची सभ्यता ,आचरणातील सत्य आणि अहिंसाच्या शाश्वत मुल्यांबाबतच्या प्रचार आणि प्रसारासाठी संपूर्ण जगात जागरूकता निर्माण होत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने २ आक्टोंबर गांधी जयंतीच्या दिनाला आंतरराष्ट्रीय अहिंसा आणि शांती दिवस म्हणून घोषित केलेले आहे. गांधीजींनी मानवी मुल्यांचा प्राप्तीसाठी संघर्ष करण्याचे एक साधन म्हणून अहिंसेच्या प्रयोगाला नवी दिशा दिली.चांगले साध्य करण्यासाठीचे साधन हे शुद्ध पवित्र असले पाहिजे असे जगाच्या इतिहासात प्रथमच त्यांनी सांगुन जसे साधन असेल तसेच साध्य होणार हे स्पष्ट  केल्याचे सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तंटामुक्त अध्यक्ष राजेशकुमार तायवाडे, ग्राम सचिव तुरकर, ग्राम पंचायत सदस्य घनश्याम पटले, विनोद बरेकर, पटले शाहीर, चुन्नीलाल बिसेन, कृषी सहायक डाहके, संगनक आपरेटर पौर्णिमा, यशकुमार, मुनेश्वर बर्वे उपस्थित होते.