विखुरलेल्या पवार समाजाने एकजूट व्हावे

0
9

रामटेक,दि.06ः- विखुरलेला असलेल्या समाजामुळे समाजाच्या समस्या पाहिजे त्याप्रमाणात सुटल्या नसल्याची खंत व्यक्त करीत विखुरलेल्या पवार समाजाने एकजुट व्हावे, असे आवाहन बडनेरा विधानसभा क्षेत्राचे आमदार रवि राणा यांनी केले.
ते समाज भवनासाठी घेतलेल्या नवीन जागेच्या आवारात पवार समाज वार्षिक स्नेहसंम्मेलन रविवारी (४ फेब्रुवारी) रामटेक येथिल तिर्थक्षेत्र अंबाडा येथे पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राजाभोज समाज भवनाचे भूमिपूजन बडनेरा विधानसभा क्षेत्राचे आमदार रवि राणा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजाभोज स्मारक समिती नागपूरचे अध्यक्ष मोतीलाल चौधरी, रामटेकचे पोलिस निरिक्षक योगेश पारधी, किसान गर्जनेचे अध्यक्ष राजेंद्र पटले, रामटेक न. प. उपाध्यक्ष कविता मुलमुले,कटंगीचे सरपंच तेजेंद्र हरिणखेडे,प्रफुल टेंभरे, प्रताप पटले, अशोक पारधी, डॉ. ओंकार चौधरी, प्रा. बोपचे उपस्थित होते.
पवार समाज बहुउद्देशिय संस्था रामटेकच्या वतीने समाज प्रसार व जागृतीकरिता बस स्थानक ते तिर्थक्षेत्रापर्यंत मोटार सायकल रॅली काढण्यात आली. प्रास्ताविक भाषणात कमलेश शरणांगत व मनीष भगत यांनी समाजाच्या उन्नतीसाठी आणि समाजातील युवक – युवती, समाजबांधवांमध्ये शिक्षण पद्धती, शेतकर्‍यांचे प्रश्न आदि विषयांवर चर्चा करण्यासाठी तसेच सामाजिक कार्याचा विचार करून राजाभोज समाज भवन निर्माण करण्यात येणार असल्याचे सांगीतले. पवार समाज विखुरलेला आहे, त्यामुळे समाजातील अनेक समस्या अद्यापही सुटल्या नाहीत. विखुरलेल्या या समाजाने एकजूट व्हावे, असे आवाहन आमदार राणा यांनी केले.
आयोजनासाठी पवार समाज बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष भगवानदास बिसने, आशीष शरणांगत, छमेशकुमार पटले, संजय बिसेन, उमेश पटले, भोजराज कटरे, खरकसिंग बिसेन, रमेश पटले, राहुल जैतवार, सचिन भोयर, धनराज शरणांगत, किशोर रहांगडाले, जयंत रहांगडाले, प्रमोद शरणांगत, दिनेश बोपचे, बालकदास सरणांगत, बबलू गौतम, रामचंद्र शरणांगत, कैलाश रहांगडाले, ईश्‍वर शरणांगत, सुभाष बिसने, गुलाब पटले, किशोर शरणांगत, राजेंद्र शरणागत, राजकुमार ठाकरेसह आदिंनी सहकार्य केले.