परसवाडा तलावात मृतावस्थेत आढळला विदेशी पक्षी

0
12

गोंदिया दि.0८ : तालुक्यातील परसवाडा येथील तलावात लेजर विजलींग डग नामक विदेशी पक्षी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. उल्लेखनीय म्हणजे, काही महिन्यांपूर्वीच दोन विदेशी पक्षी तलावात मृतावस्थेत आढळले होते.देशी, विदेशी दुमिळ प्रजातींच्या पक्ष्यांव्यतिरिक्त केवळ गोंदिया जिल्ह्यात सारस पक्ष्यांचे वास्तव आहे. परंतु, या पक्ष्यांच्या संवर्धनाबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे दिसते. आज, बुधवारी लेजर विजqलग डग या पक्ष्याचा मृतदेह आढळून आल्याने पक्षीप्रेमींमध्ये qचतेचे वातावरण आहे. परसवाडा येथील तंमुस अध्यक्ष अनुराग शु़क्ला यांनी याबाबतची माहिती वनविभाग, जिल्हा प्रशासन व पशुवैद्यकीय अधिकार्यांना दिली. मात्र, या अधिकार्यांनी प्रकरण गांभीर्यांने घेतले नसल्याचे दिसून आले.