शांती प्राप्तीसाठी प्रजापिता ब्रम्हाकुमारीचे मोलाचे कार्य – पालकमंत्री बडोले

0
13

गोंदिया,दि.0८ :-प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्‍वविद्यालय संपूर्ण देशात व विदेशात आध्यात्मिक ज्ञान देवून लोकांना जीवन जगण्याची नवीन दिशा व पद्धती शिकवत आहेत. जगात शांतीच्या शोधात अनेक लोक भटकतात. त्यांना ध्यान, योगच्या माध्यमातून आत्मशुद्धी व चित्तशुद्धीचे कार्य या विश्‍वविद्यालयातून होत आहे. व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याकरिता प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्‍वविद्यालयाचे मोलाचे कार्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
त्यांनी नुकतेच कन्हारटोली येथील प्रजापिता बह्मकुमारी विश्‍वविद्यालयाच्या केंद्रात भेट देवून आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रामुख्याने राजयोगिनी गिता दिदी (माऊंटआबू), र%माला दिदी (गोंदिया केंद्र संचालिका), विजयराज सिंग (राजस्थान), विनोद गोयल (हरयाणा), डॉ. राधेश्याम अग्रवाल, विनोद हरिणखेडे, प्रदिपसिंग ठाकूर, सुनील केलनका, जयंत शुक्ला आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री बडोले यांनी केंद्राला भेट देवून आनंद होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. याप्रसंगी र%माला दिदी व गिता दिदी यांनी संस्थेच्या कार्याबद्दल माहिती देत मार्गदर्शन केले. विश्‍वविद्यालयाच्या वतीने ना. बडोले यांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन शर्मिला पाल यांनी केले. यावेळी मोठय़ा संख्येने प्रजापिता बह्मकुमारी विश्‍वविद्यालयाचे रेखा दिदी (उमरेड), माधुरी दीदी (वर्धा), प्रेमलता दिदी (कामठी), जयमाला दिदी (हिंगणघाट), राधेश्याम अग्रवाल, गोविंद अग्रवाल, श्रीरामभाई ठाकूर, भालचंद्र ठाकूर, उदय गजघाट, रेखा अग्रवाल, आरती पारधी, कलाबाई मस्के, नेहा बावनकर, सरोज गुप्ता, मिना एकनाथे, शिव बघेले, चैयनलाल मडीया, राधेश्याम पारधी, भरत पटले, वसंत अग्रवाल, निखाडे मेजर, यादव मस्के, सुनील भांडारकर, बालकदास बागडे, शिल्पा वंजारी आदी ईश्‍वरी विद्यार्थी उपस्थित होते.