शहराला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी आता शालेय विद्याथ्र्यांचा सहभाग

0
7

गोंदिया,दि.१२ः-स्वच्छ भारत अभियानातंर्गत गोंदिया नगर परिषदच्या आरोग्य विभागाच्या वतीने शालेय विद्याथ्र्यांना प्लास्टिक मुक्त अभियानात जोडले गेले आहे. शहरातील सर्व खाजगी व नगर परिषदेच्या शाळांना या संदर्भात नगर परिषदेच्या मुख्याधिकाèयांनी पत्र पाठविले आहे.
स्वच्छ भारत अभियानातंर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ साठी प्लास्टिक बंदीचा एक अभिनव प्रयोग गोंदिया नगर परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे. या उपक्रमातंर्गत मुख्याधिकारी पाटील यांनी शहरातील सर्व खाजगी व नगर परिषदेच्या शाळांना पत्र लिहून शाळेतील विद्याथ्र्यांनी आपल्या घरुन रोज एक प्लास्टिक पिशवी आणावी असे आवाहन केले आहे. बहुतांश शाळांनी या उपक्रमातंर्गत काम सुरू केले आहे. गत दोन महिन्यापासून यावर अंमलबजावणी करण्यात येत आहे. शाळेमध्ये ज्या प्लास्टिकच्या पिशव्या गोळा होतात, त्या नगर परिषदेच्या वाहन चालकांकडे सोपविल्या जातात. हे वाहन दर शुक्रवारी सर्व शाळांमध्ये जावून तेथील प्लास्टिक उचलून घेवून जातात. नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाèयांच्या मते प्रत्येक घरातील प्लास्टिक पिशव्या गोळा केल्या जातात हे शहराला प्लास्टिक मुक्त करण्याच्या दिशेने उचललेले ठोस पाऊल आहे. भविष्यात शहरात प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर बंद करण्यात येईल. या प्रयोगाने शहरातील शाळा, महाविद्यालयांमधून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती मिळाली आहे. उल्लेखनिय असे की, शहरातील शाळा व महाविद्यालयात जागृततेसाठी स्वच्छता समिती गठित करण्यात आल्या आहेत.