महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये तृतीयपंथीयांकडून प्रवाशांची लूटमार

0
10

गोंदिया,दि.१३ः-गोंदिया रेल्वेस्थानकावरुन सुटणाèया गोदिंया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये तृतीयपंथीयाकंडून (किन्नर) प्रवाशांसोबत गैरवर्तणूक करीत पैशे उकडण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत असतानाही याप्रकारापासून रेल्वेपोलीस प्रवाशांना सुरक्षा देण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. हे तृतीयपंथी तुमसर,नागपूर, अजनी, वर्धा, बडनेरा इ. स्थानकावरुन गाडीत प्रवेश करुन रेल्वेगाडीतील प्रवाशाकंडून पैसे उकळण्याचा धंदा करतात.त्यांचा विरोध केल्यास अश्लील गैरवर्तणूक करीत शिवीगाळ करीत असल्याचे प्रकार सातत्याने होत असून आज १३ फेबुवारीला सुध्दा गोंदियावरुन नागपूरकरीता गाडी रवाना झाल्यानंतर तुमसर स्थानकापासून त्रास देण्यास सुरवात केल्याची माहिती सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रवाशांनी दिली आहे.या तृतीयपंथीयावर तत्काळ कारवाई करुन रेल्वे प्रशासानाने सुरक्षा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी प्रवाशी करु लागले आहेत.