खा.पटेल व श्रीमती पटेलांनी महाशिवरात्रीनिमित्त केले महाप्रसादाचे वितरण

0
15

गोंदिया,दि.१३ः- आज महाशिवरात्रीच्या पर्वावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी गायमुख(तुमसर) येथे तर मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे भाविकांना महाप्रसादाचे वितरण करुन भगवान शिव यांचे दर्शन घेतले.गायमूख व प्रतापगड येथे पटेल दाम्पत्यांनी पुजाअर्चना केली.
गायमुख येथे खासदार पटेल यांच्यासोबत माजी आमदार अनिल बावनकर,विजय डेकाटे, देवेन्द्रनाथ चौबे,जिल्हा परिषद सभापती धनेन्द्र तुरकर,जिल्हा परिषद सभापति रेखा ठाकरे, विठ्ठल कहालकार,माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे,देवचंद ठाकरे,किरण अतकरी,सुरेश रहांगडाले उपस्थित होते.
त्याचप्रमाणे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगढ़ देवस्थान येथे मनोहरभाई पटेल अकेडमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल यांनी आरती करुन दर्शन घेतले.त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.यावेळी निखिल जैन,राजू.एन.जैन,युवक काँग्रेस अध्यक्ष व जि.प.सदस्य किशोर तरोणे,लोकपाल गहाणे,राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष केतन तुरकर,नामदेव डोंगरवार,यशवंत गणवीर,बंडूभाउ भेंडारकर,शिशुला हलमारे,राकेश जायसवाल,राकेश लंजे,भोजराज रहिले,निर्मला ईश्वर,नानाजी मेश्राम,आशिक जैन,संकल्प जैन,शिवम अग्रवाल,मनोहर शहारे,जे.के.कालसर्पे,शालिक हातझाड़े आदी उपस्थित होते.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमेटी तुमसर-मोहाडी विधानसभा मतदारसंघाच्यावतीनेही महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रमोद तितिरमारे सचिव म काँ कमेटी,अमर रगडे अध्यक्ष तुमसर शहर काँग्रेस,सिमाताई भुरे जिलाध्यक्ष महिला काँग्रेस,शंकर राऊत अध्यक्ष तुमसर तालुका,नीरज गौर अध्यक्ष युवक कांग्रेस विधानसभा,प्रफुल्ल बिसने अध्यक्ष तालुका युवक कांग्रेस,शुभम गभने अध्यक्ष तुमसर तालुकाछडणख,आनंद बिसने, सहादेव तुरकर,गळीराम बांडेबुचे,सुरेखा सहारे,गजानन लांजेवार,दिनेश भवसागर, काँग्रेस पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ता उपस्थित होते.