ग्रापं.पोटनिवडणुकीत सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड

0
7
OLYMPUS DIGITAL CAMERA
ग्राम पंचायत पोटनिवडणुकीत तालुक्यात मतदान नाही, शासकीय खर्चाची बचत
तिरोडा,दि.23ः- येत्या २५ फेब्रुवारी रोजी राज्यात होणाºया ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत तालुक्यातील रिक्त १० जागांकरिता तिरोडा निवडणूक अधिकाºयांनी निवडणूक जाहीर केली. मात्र, यातील एका जागेकरीता नामनिर्देशन पत्रच न आल्याने तर इतर जागी एक-एकच अर्ज आल्याने तालुक्यात कुठेही मतदान होणार नसून यामुळे मोठ्या प्रमाणात शासकीय खर्चाची बचत होणार आहे.
 तिरोडा तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीतील १० सदस्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार संजय रामटेके यांनी जाहीर केल्याप्रमाणे ५ ते १२ फेब्रुवारीपर्यंत आॅनलाइन पद्धतीने नामनिर्देशनपत्रे मागविण्यात येवून १४ फेब्रुवारी रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात आली. यात तालुक्यातील घोगरा, लोणारा, सर्रा, मारेगाव, चोरखमारा, पालडोंगरी या सहा ग्रामपंचायतीकरिता १० ग्रामपंचायत सदस्य पदाकरिता मारेगाव येथील एक पदाकरिता एकही अर्ज न आल्याने येथील पद रिक्तच राहणार असून लोणारा ग्रामपंचायतीचे दोन पदाकरिता दोन अर्ज, घोगरा ग्रामपंचायतीचे एकपदाकरिता एकच अर्ज, सर्रा ग्रा.पं.च्या दोन पदाकरिता दोन अर्ज, चोरखमारा ग्रा.पं. एक पदाकरिता एकच अर्ज तर पालडोंगरी येथील ३ सदस्यपदाकरिता तीनच अर्ज आल्याने एकूण १० रिक्त जागेकरिता ९ अर्ज तर मारेगाव ग्रामपंचायतीचे एक सदस्यपदाकरिता एकही अर्ज न आल्याने व इतर पाच ग्रामपंचायतीचे सदस्य पदाकरिता एक-एकच अर्ज आल्याने व आलेले सर्व अर्ज वैद्य असल्याने ग्रामपंचायत पोट निवडणुकीकरिता राज्यात इतरत्र मदान होणार असले तरी तालुक्यात कुठेही मतदान होणार नसल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार संजय रामटेके, नायब तहसीलदार आर.डी. पटले यांनी दिली आहे. यामुळे शासनाचे मोठ्या खर्चाची बचत होणार आहे.