संयुक्त आरोग्य महाशिबिरात गोंदिया जिल्हयाच्या लोकप्रतिनिधींना वगळले 

0
36
दिव्यांगांच्या नावावर राजकारणाचा खेळ, लोकसभा पोटनिवडणुकीवर डोळा
गोंदिया,दि.२३:-  राज्यसरकारच्या वतीने दिव्यांगाना प्रमाणपत्र वाटप करून जिरो पेंडन्सी अंतर्गत सामाजिक न्याय विभागाने गोंदिया जिल्हयात दिव्यांगाची तपासणी व प्रमाणपत्र वितरण महाशिबीराचा पायलट प्रकल्प हाती घेतला आहे. राज्यातील इतर जिल्हयात कुठेही हा प्रकल्प अद्याप राबविण्यात आलेला नसून गोंदिया जिल्हयातील कार्यक्रमा नंतर राज्यातील इतर जिल्हयात टप्या-टप्याने राबविण्यात येणार आहे. गेल्या तीन चार दिवसापासून गोंदिया जिल्हयात सुरू असलेल्या दिव्यांग तपासणी शिबीराला आता भंडारा-गोंदिया संयुक्त जिल्हयाच्या नावावर भंडारा येथे उद्या २४ पेâब्रुवारी शनिवार ला दिव्यांग तपासणी महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भंडारा जिल्हयात आयोजित या कार्यक्रमात राज्यमंत्रयाचा दर्जा असलेल्या जि.प.अध्यक्षांना पाहिजे ते मानाचे स्थान देण्यात आलेले नाही . त्यातच हा कार्यक्रम भंडारा व गोंदिया जिल्हा आरोग्य विभागाच्या संयुक्त वतीने राबविण्यात येत असतांनाही कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत मात्र गोंदिया जिल्हयाचे पालकमंत्री ,राज्यसभा खासदार ,चिमूर गडचिरोलीचे खासदार आणि राज्यमंत्रयाचा दर्जा असलेल्या गोंदिया जि.प.अध्यक्ष व इतर पदाधिकारी यांच्या सह गोेंदिया जिल्हाधिकारी व जि.प.च्या सीईओचा नावाचा कुठेच उल्लेख दिसून येत नाही.
 या दिव्यांग महाशिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्या आरोग्य विभागाचे गोंदिया जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांचे नाव मात्र पत्रिकेत आवर्जुन दिसून येत आहे.त्यातही या कार्यक्रमाचा निधी आरोग्य उपसंचालक कार्यालयातून कपात केला जाणार असून गोंदियाच्या निधीवर नजर राहू शकते अशी चर्चा जिल्हापरिषदेच्या कार्यालयात एैकावयास मिळत होती. यात विशेष म्हणजे गोंदिया जिल्हयातील एका ही आमदाराचा उल्लेख करण्यात आलेला नाही. या दिव्यांग महाशिबिराचे उद्घाटन भंडारा चे पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या अध्यक्षतेखाली,विधानपरिषद सदस्य डॉ. परिणय पुâके यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला भंडारा जिल्हयातील सर्व आमदार भंडारा जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी ,जिल्हाधिकारी व सीईओ मात्र उपस्थित राहणार असल्याचे पत्रिकेवरून दिसून येत आहे. मात्र संयुक्त महाशिबिराचे नाव असतांनाही गोंदिया जिल्हयातील लोकप्रतिनिधींना डावलण्याचे कारण काय अश्या चर्चा रंगू लागल्या आहेत. तर भंडारा येथे आयोजित करण्यात आलेले हे तडकाफडकीचे महाशिबिर हे येत्या काही महिण्यात होवू घातलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जनतेमध्ये सत्ताधा-याविरूद्ध असलेला आक्रोश शमविण्याकरिता असल्याची चर्चा ही आता सुरू झाली आहे.
दरम्यान या कार्यक्रमासंदर्भात गोंदियाचे चे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेन्द्र पातुरकर यांना विचारणा केली असता आमदार परिणय पुâके यांनी आयोजित केलेला हा महाआरोग्य शिबिर असून ते दोन्ही जिल्हयाचे लोकप्रतिनिधी असल्याने व आरोग्य विभागाचा कार्यक्रम असल्याने भंडारा जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आमचे नाव पत्रिकेत टाकले असावे असे सांगितले.