पोकळ आश्वासन देत नाही- आमदार बाळा काशिवार

0
31
लाखांदुर,दि.25 :-गेल्या दहा वर्षापासुन दुर्लक्षीत असलेल्या रस्त्याच्या कामाकरीता आपण सततचा पाठपुरावा करून मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत मागिल वर्षी भागडी व दिघोरी/मोठी जिल्हा परिषद क्षेञातील तर यावर्षी पिपळगाव, मोहरणा, मासळ क्षेञातील रस्ते मंजुर करून घेतले. जे दहा वर्षांत करू शकले नाही ते आपण तिन वर्षांत पुर्ण केले असून, उर्वरित रस्ते पुढील टप्प्यात पुर्ण करू. आम्ही नुसतच पोकळ आश्वासन देत नाही तर प्रत्यक्षात करून दाखवतो असे प्रतिपादन आमदार बाळा काशिवार यांनी केले. ते लाखांदुर तालुक्यातील रस्त्यांच्या भुमिपुजनाप्रसंगी बोलत होते.
     मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सन २०१६-१७ संशोधन व विकास कार्यक्रम अंतर्गत आमदार बाळा काशिवार यांच्या स्थानिक विकास निधीतून लाखांदुर तालुक्यातील बहुप्रतिक्षीत पिंपळगाव/को ते मडेघाट, कन्हाळगाव ते मेंढा/चप्राड, रामा ३५४ ते सावरगाव, रामा ३५४ ते खैरी/पट, रामा ३५४ आसोला ते मांदेड, रामा ३५४ परसोडी/नाग ते कुडेगाव, रामा ३५४ ते रोहनी, दोनाड ते किरमटी, प्रजिमा ३९ घोडेझरी ते पालेपेंढरी, प्रतिमा ३८ सोनेगाव ते पेंढरी या रस्त्याचे भुमिपुजन (ता.२४) करण्यात आले.
      यावेळी जि.प.अध्यक्ष रमेशजी डोंगरे, जि.प.सदस्या प्रणालीताई ठाकरे​, जि.प.सदस्या शुद्धमता नंदागवळी​ भाजपा तालुकाध्यक्ष नुतन कांबळे, पं.स.सभापती मंगलाताई बगमारे​, उपसभापती शिवाजी देशकर​, कार्यकारी अभियंते श्री.शुक्ला, पुंडलिकजी पेलने​, संगिताताई ठाकरे​, नगराध्यक्षा निलम हुमने, भाजयुमो तालुकाध्यक्ष हरीष बगमारे, महिला आघाडी अध्यक्षा वैशाली राऊत, राजेश नाकतोडे, गोपी भेंडारकर, सखाराम तोंडरे, भारती दिवटे, रिता गोटफोडे, संगिता गुरनुले, माधुरी हुकरे, नेहा बगमारे, ज्योती रामटेके, निशा रामटेके, मंगला शेंडे, होमराज ठाकरे, राजेश नाकतोडे, सुनिल भोवते, विलास तिघरे, मुनेश्वर दिवटे, गोसु कुंभरे, सुमेद रामटेके, नामदेव पिलारे, स्मिता बुराडे, सुनिता मेश्राम, दत्तु दोनाडकर यांच्यासह सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य व आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन एम.एम.लांजेवार यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योंगेश ब्राह्मणकर, गोपाल तर्हेकर, राहुल राऊत, विजय खरकाटे, प्रल्हाद देशमुख, भारत मेहंदळे, तुलसीदास बुरडे, भुषण चिञिव, यश खञी, रजत गौरकर, जितेंद्र ढोरे, प्रविन राऊत, पवन समरत, विश्वपाल हजारे, रूपेश काळबांधे, राहुल येवले, हेमंत मेश्राम, डाकराम बुरडे, नरेश मांढरे, पवन झोडे यांच्यासह सर्व भाजपा पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.