भाषेचे संवर्धन ही आपली जबाबदारी: डॉ. निलिमा कापसे

0
6

•लिटील फ्लावर शाळेत मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

लाखनी, दि.28: – व्यक्ती कोणत्याही विषयात किंवा भाषेत पारंगत असो परंतु आपण महाराष्ट्रात राहतो त्याअर्थी मराठी आपली मातृभाषा आहे. मराठी भाषा ही हृदयाला भिडनारी भाषा असून आपल्या मातृभाषेत स्वताला व्यक्त करण्यात सर्वात मोठा आनंद आहे. मराठी भाषेचं संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे आणि मराठी भाषेतील साहित्य नव्या पिढीपर्यन्त पोहोचवण्यासाठी आपन विशेष प्रयत्न करायला पाहिजेे असे मत डॉ. निलिमा कापसे यांनी व्यक्त केले.
त्या द लिटिल फ्लावर शाळा लाखनी येथे मराठी भाषा दिन कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या आशा वनवे तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक आशीष बडगे, सहा.शिक्षक प्रशांत वाघाये उपस्थित होते. जागृती बगमारे, समिग्रा वनवे, पूर्वा कानतोडे, अपूर्वा लामकाने या विद्यार्थ्यांनी याप्रसंगी भाषणं दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी डोरले यांनी तर आभार विद्या फरांडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पुष्पा मानकर, वर्षा बांते, विशाल हटवार, प्रतिक्षा बंसोड, कृष्णा उइके तसेच सर्व शिक्षकवृंद यांचे सहकार्य लाभले.