सटवा येथे तलाव खोलीकरण कामाचे भूमिपूजन

0
13

गोरेगाव,दि.03ः-तालुक्यातील सटवा ग्रामपंचायतीच्यावतीने आज(दि.03) शनिवारला  जिल्हा परिषद सदस्या श्रीमती रोहिणीताई वरखडे यांच्या अध्यक्षतेत सरपंच विनोद पारधी यांच्या हस्ते महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत तलाव खोलीकरण (रु. 21 लक्ष )कामाचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी चित्रकलाताई चौधरी (माजी सभापती पं.स. गोरेगाव),योगेश चौधरी,डाँ.के.टी.कटरे(संचालक ख.वि.सं.गोरेगाव),रमेश ठाकुर,ओमप्रकाश चौधरी (उपसरपंच),टिकाराम रहांगडाले(पो.पा.) उमराव कडुकार, ग्रामपंचायत सदस्य ओमेंद्र ठाकुर,चित्रकलाताई रहांगडाले,गिताताई रहांगडाले,रामेश्वरीताई ठाकुर व कु.एस.जे.पाटील (ग्रामसेविका), घनश्याम बोडणे (रोजगार सेवक), चंद्रहाश पारधी ,भोजराज कटरे, दिलीप रहांगडाले,संजय कटरे,इंद्रराज पटले, इंद्रजित राऊत,प्रदिप वैद्य उपस्थित होते.