25.3 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ भिवखिडकी येथे जलयुक्त शिवार कामाचे भूमिपूजन

भिवखिडकी येथे जलयुक्त शिवार कामाचे भूमिपूजन

0
23

अर्जुनी मोरगाव,दि.०७ः- जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभाग अर्जुनी मोरगावच्या वतीने तालुक्यातील भिवखिडकी येथे जलयुक्त शिवार व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मामा तलावाच्या खोलीकरण कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पंचायत समिती सदस्य नाजूक कुंभरे,तहसिलदार भंडारी,भिवखिडकीचे उपसरपंच नागपूरे,उपविभागीय अभियंता,कनिष्ठ अभियंता शशिकांत काळे,शाखा अभियंता सी.के.पटले,प्रमोद लांजेवार,निलकंठ बोरकर,श्री भिमटे आदी मान्यवर उपस्थित होते.या कामावर ३५१ कामगारांनी पहिल्याच दिवशी उपस्थिती नोंदविली.