नागपूर-गोंदिया-नागपूर विदर्भ एक्सप्रेस महिलांच्या हाती

0
11

गोंदिया/नागपूर,दि.08 : उपराजधानीतील अजनी रेल्वेस्थानकाचे संचालन गुरुवारपासून पूर्णपणे महिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाच्या पर्वावर मध्य रेल्वेने दिलेली ही गौरवपूर्ण भेट ठरावी. कायमस्वरूपी “महिला राज’ असलेले अजनी हे मध्यभारतातील हे पहिले तर देशातील तिसरे रेल्वेस्थानक ठरले आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील इतवारी स्थानकाचे संचालनही आज दिवसभर महिलाच सांभाळत आहेत. त्यातच या विभागातंर्गत चालविण्यात येणार्या गोंदिया-मुंबई-गोंदिया विदर्भ एक्सप्रेसचे संचालन आज गुरुवारला नागपूर-गोंदिया-नागपूर दरम्यान महिलांच्या हाती सोपविण्यात आले.गोंदिया-नागपूर मार्गावर विदर्भ एक्सप्रेसमध्ये सर्वच विभागात महिलांना जबाबदारी सोपविण्यात आली.गोंदियातील रेल्वेस्थानकावरही स्वच्छतेपासून तर टिकिट घर व  इतर क्षेत्रातही आज महिलांना संधी देण्यात आली.

विदर्भ एक्सप्रेस पहिल्यांदा महिलांच्या हाती अाली.विदर्भ एक्सप्रेसमध्ये वरिष्ट टिकीट निरिक्षक श्रीमती हेमावती,रजनी बैस,विधी अग्रवाल,आरोग्य निरिक्षक पुजा गुप्ता, टिकीट बुकिंग आॅफिसमध्ये संघमित्रा बागडे,सुजाता मोडक,श्रीमती एस.धवनकर,एस.मारीया ,दुर्गा पासवान यांनी काम पाहिले.विशेष म्हणजे नागपूर-गोंदिया-नागपूरकरीता रवाना झालेल्या विदर्भ एक्सप्रेस रेल्वेच्या लोकाेपायलट(इले.)सुनिता चौधऱी व सहलोकोपायलट कु. स्नेहा सहारे,गार्ड कौशल्या शाहू यांच्यासह 8 वाणिज्यक कर्मचारीही महिलांच होत्या.त्यामध्ये तिकिट निरिक्षक कु.वदंना बनसोड,स्मिता तापस,रिना धवलकर,योगिता गायकवाड,संगिता डोंगरे यांच्यासह भरारीपथकात श्रीमती एस.मेंढे,करुणा रंगारी व वैशाली टाले यांचा समावेश होता.रेलवे पोलीस फोर्सच्या दलात संगिता शाहू व रोशनी यादव यांनी जबाबदारी सांभाळली.इतवारी रेल्वेस्थानकावरही महिलांना कामकाज सांभाळला.गोंदिया स्थानकावर महिला लोकोपायलटसह सर्व महिला कर्मचार्यांचे स्वागत करण्यात आले.