तिगाव आरोग्य केंद्रांची बत्ती गुल

0
10

आमगाव,दि.१६ः-गोंदिया जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातंर्गत येत असलेल्या आमगाव तालुक्यातील qतगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विज बिलाचे देयेक मागील दोन ते तीन महिन्यापासून न भरल्याने विज वितरण कपंनीने १५ मार्च रोजी आरोग्य केंद्राचा विज पुरवठाच खंडीत केला.विज वितरण कंपनीने ज्यावेळी या प्राथमिक आरोग्य केद्रांचा विज पुरवठा खंडीत केला,त्यावेळी ४ मqहला रुग्ण दाखल होते.त्या महिला रुग्णांना रात्र अंधारात काढावी लागली आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्राला विज देयके भरण्यासाठी निधीच उपलब्ध करुन दिला नसल्याची माहिती समोर आली आहे.