लोधी समाजाचा ओबीसीच्या यादीमध्ये समावेश करा

0
12

आमगाव,दि.२८: लोधी शक्ती संघटना जिल्हा गोंदियाच्या वतीने लोधी समाज मेळावा व युवक-युवती परिचय संमेलन आणि लोधी गौरव सत्कार समारोहाचे आयोजन साई मंगलम लॉन येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार भेरसिंह नागपुरे होते. उद्घाटक म्हणून गडचिरोलीचे खासदार अशोक नेते उपस्थित होते.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. संजय पुराम, शहदी अवंतीबाई लोधी फाऊंडेशन दिल्लीचे संस्थापक लोधी लाखनसिंह, अखिल भारतीय लोधी महासभा फरीदाबादचे संरक्षण कमलसिंह वर्मा, झारखंड लोधी क्षत्रिम महासभा टाटानगरचे युवा अध्यक्ष राजकुमार जंघेल, महासचिव कमल प्रकाश, सचिव लोधी अवध, लोधी समाज बालाघाटचे समाजसेवी सुनिता जंघेला, माजी जि.प.अध्यक्ष रजनी नागपुरे, माजी सभापती यादनलाल बनोठे, पं.स. सदस्या प्रमिला दसरीया, प्रतिभा परिहार, लोधी अधिकार जनआंदोलनाचे प्रमुख  राजीव ठकरेले, अवंती लोधी महासभाचे राष्टÑीय अध्यक्ष शिव नागपुरे, लोधी समाज छत्तीसगडचे सचिव प्रल्हाद दमाहे, बेटा बचाव राष्ट्रीय अभियानचे संयोजक ईश्वर उमरे, पदमा कुराहे, वरिष्ठ समाजसेवक कुवरलाल मच्छिरके, लोधी कर्मचारी संघटनेचे दयाराम तिवडे, अशोक नागपुरे, लोधी समाज सेवा समिती आमगावचे अध्यक्ष जागेश्वर लिल्हारे, देवेंद्र मच्छिरके उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान लोधेश्वर, विरांगणा महाराणी अवंतीबाई लोधी, स्वाती ब्रम्हानंदजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन करण्यात आली. कार्यक्रमात लोधी शक्ती संघटनेचे माजी महासचिव महेंद्र कुराहे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
लोधी समाजाला केंद्रात इतर मागासवंर्गात समाविष्ठ करण्यात यावे. या मागणीसाठी आपण जनआंदोलन उभारुन सरकारला याची जाणीव करुन देण्याचा संकल्प केला. नेते यांनी लोधी समाजाला केंद्रात इतर मागासवर्गात समाविष्ठ करण्यात यावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. पुराम यांनी लोधी समाज हा आपल्या क्षेत्रात बहुसंख्य प्रमाणात आहे. या समाजाला केंद्रात इतर मागासवर्गमध्ये समाविष्ठ करण्याची मागणी लावून धरणार असल्याचे सांगितले. उपस्थित अन्य मान्यवरांनी या वेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोधी मिलन समारोहाचे अध्यक्ष ज्ञानीराम दमाहे यांनी केले. संचालन युवक-युवती परिचय संमेलन प्रमुख चरण डहारे यांनी तर आभार महासचिव तिलकचंद लिल्हारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोधी शक्ती संघटना आमगाव मंडलचे अध्यक्ष दयाल डहारे, कोषाध्यक्ष दिलीप बनोठे, सेवक उपराडे, रंजित मच्छिरके, किशोर बल्हारे, राजकुमार बसोने, कोमल लिल्हारे, सतिश दमाहे, प्रकाश दमाहे, देवेंद्र मचिया, बद्रीप्रसाद दसरिया, राजकुमार नागपुरे, रामसिंग मच्छिरके, पूर्णानंद ढेकवार, संतात्वरुप लिल्हारे, नरेंद्र बहेटवार, कबीर माहुले, देवेंद्र बरैया, नेतराम मच्छिरके, हेमराज सुलाखे, देवेंद्र नागपुरे, कमल सुलाखे, गोविंद लिल्हारे, धनराज बनोढे, लोधी शक्ती संघटन आमगावचे महिला अध्यक्ष प्रभा उपराडे, सुनिता बहेटवार, सीता नागपुरे, ममता मच्छिरके, नर्मदा लिल्हारे, कल्पना बनोसे, रीता बनोठे, सुमन दमाहे, सुखवंती उपराडे, यांनी सहकार्य केले.