जन वन विकास समिती बोंडे तर्फे ८८ महिलांना एलपीजीचे वितरण

0
8
गोदिया ,दि.१ःजंगलाजवळील गावात राहणारे ग्रामस्थ दररोज च्या स्वयंपाकाकरिता जंगलातील लाकूड वापरतात त्यामुळे दिवसेंदिवस जंगलातून वृक्षतोड होत असून यामुळे जंगल सपाट होत आहे. याकरिता शासनातऱ्फे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकासjयोजना अंतर्गत अश्या घनदाट जंगलाजवळील वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना एल.पी.जी.गैस वाटप कार्यक्रम सुरू करण्यात आले आहे. वन विभागामार्पâत हे उपक्रम राबविले जाते. या अंतर्गत डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना अंतर्गत ग्राम परिस्थिती विकास समिती बोंडे अंतर्गत बोंडे गावातील ८८ महिला  लाभाथ्र्यांना एल.पी.जी. गैस वाटपाचा कार्यक्रम आज शनिवार दिनांक ३१ मार्च २०१८ ला साजरा करण्यात आला . वनविभाग नवेगावचे सहायक वनसंरक्षक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शना ग्राम बोंडे येथील ८८ कुटुंबातील लाभाथ्र्यांना एल.पी.जी. गैस चे कनेक्शन वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक महणून नवेगाव वन्यजीव अभयारण्याचे सहायक वनसंरक्षक प्रदीप पाटील  तसेच बोंडे चे वनपरिक्षेत्राधिकारी महेश चोपडे व उत्तर देवरीचे वनपरिक्षेत्राधिकारी मारबते , डवकी हायस्कुलचे मुख्याध्यापक मेश्राम, बोंडे चे वन्यजीव क्षेत्र सहायक बी.एच.साखरे व डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास समिती बोंडे चे अध्यक्ष अरूण सुखराम पंधरे,म्हैसुलीचे अध्यक्ष बाबुलाल सलामे ,सचिव एस.पी.यादव, वनरक्षक ए.डी. शहारे, कोषाध्यक्ष मुस्तफा पठाण, उपाध्यक्ष दिनेश रामलाल टेंभुर्णे, प्रामुख्याने उपस्थित होते.  पार पडलेल्या एल.पी.जी. गैस वाटप कार्यक्रमाचे संचालन कृष्ण मारोती बर्गे  यांनी केले.