सरपंच हरिणखेडे यांची कटंगी बुजरुकला स्मार्ट गाव करण्यासाठी वाटचाल

0
30

गोरेगाव,दि.07 : तालुक्याच्या गावापासुन ३ कि मी अंतरावर असलेल्या कटंगी बुजरुक ला ५ महीन्याच्या कालावधीत ३ कोटीचे विकासात्मक कामे सरपंच तेजेंद्र रुपलाल हरिणखेडे यांनी करुन घेतली  कटंगी बुजरुक ला स्मार्ट गाव बनविण्याकडे वाटचाल सुरु केली आहे.

३ हजार लोकसंख्या असलेल्या कटंगी बुजरुक येथे सर्वसाधारण जिल्हा परिषद शिक्षक असलेल्या कुटुबांत तेजेंद्र हरिणखेडे यांचा जन्म झाला त्यांनी मास्टर ऑफ शोसल वर्क ची पदवी घेतली व शासकीय नोकरी न करता सामाजीक कामे करण्याचा विचार केला. तेजेंद्र हरिणखेडे यांनी १२ नोव्हेबर २०१७ ला सरपंच म्हणुन पदभार सांभाळला सर्व प्रथम गावातील समस्या, अडचणी, आवश्यकता यावर गावक-यांसी चर्चा बैठक केली व पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीना भेटी देवुन गाव विकास आराखडा तयार केला सामान्य फंडातुन ग्रामपंचायत इमारतीला सुशोभीत करुन सर्वांना बसण्याची व्यवस्था केली.

पाणी टंचाईवर आळा घालण्यासाठी घनकचरा व सांडपाणी योजनेतुन गावातील विधन विहीर, विहीर, नळ स्टॉंड पोज जवळ शोस खड्डे करुन पाणी मुरवुन पाणी पातळी वाढविण्यासाठी कामे सुरु केली व पाणी शुद्धीकरणा करीता क्लोरीफाई यंत्रे बसविली. जिल्हा परिषद निधीतुन शाळेची आवार भिंत, वर्ग खोली दुरुस्ती, आरोग्य उपकेंद्राची आवारभिंत तयार केला, आमदार विजय रहांगडाले यांच्या स्थानिक निधीतुन चंद्रपुरटोली येथे सिमेंट रस्ता बांधकाम, १४ व्या वित्त आयोगातुन अंगणवाडी आवारभिंत केले शेत सिंचनाकरीता महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतुन अकुशल कामाव्दारे कालवा दुरुस्ती व पिचिंग ८०० मजुरांच्या सहकार्याने केले त्यामुळे ४० हेक्टर शेतजमिन सिंचनाखाली येणार आहे शेतापर्यत पोहण्याकरीता दोन पादंन रस्ते तयार केले पंतप्रधान सडक योजनेतुन दीड कोटी रुपयाव्दारे कटंगी बुजरुक ते सिलेगाव रस्त्यावर सिमेंट व डामरीकरण रस्ता, पुलाची कामे प्रगती पथावर सुरु आहेत माता माय देवस्थानात सौर उर्जा प्रकल्पामार्फत दुहेरी हातपंपाचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला आहे या ठिकाणी सौर उर्जेव्दारे मंदीर, परिसरात सौर उर्जा दिवे लागणार आहेत सार्वजनिक शौचालय स्वच्छ भारत मिशन निधीतुन बांधकाम होत आहे शाळेची गुणवत्ता वाढीकरीता विशेष भर देणार आहेत, गावातील सांडपाणी, पावसाळी पाणी वाहुन जाण्यासाठी सिमेंट नाली बांधकाम करण्यात आले रस्त्यावरील शेणखताचे ढिगारे हटवुन रस्ता सपाटीकरण सुरु केला आहे.

अनुसुचित जाती सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहीती कलापथका मार्फत जनजागूती , रामनवमीला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मुनेश्वर शहारे ते मांगो साखरे यांच्या घरापर्यत असलेली सांडपाणी व पावसाळी पाणी वाहुन नेण्यासाठी नाली बांधकाम करण्यात आले यामुळे अनेक वर्षाची समस्या सुटली, कटंगी नाल्यावर धनलाल हरिणखेडे यांच्या शेतापासुन ते जसवंता चौरागडे यांच्या शेता पर्यत नाला सराळीकरण करण्याचे प्रस्ताव सादर केले आहे या विकास कामाकरीता जिल्हा निधीची मोठ्या प्रमाणात गरज भासत असल्याने माजी सरपंच डेमेंद्र रहांगडाले यांच्या सहकार्य लाभत आहे ही सर्व विकास कामे गावक-यांच्या सहकार्यानेच झाल्याने कटंगी बुजरुक ला स्मार्ट गाव करण्यासाठी वेळ लागणार नाही असी माहीती सरपंच तेजेंद्र हरिणखेडे यांनी दिली.