कंत्राटदार पाथोडेचे दुर्लक्ष,शहरातील हातपंप नादुरुस्त

0
9

गोंदिया,दि.08ः-गोंदिया नगरपरिषद क्षेत्रांतर्गत येत असलेल्या सर्वच प्रभागातील हातपंप,विंधनविहीर असो की पिण्याच्या पाण्याशी संबधित कामे करण्यासाठी गोंदियातील पाथोडे नामक कंत्राटदाराला कंत्राट मंजुर झाले आहे.परंतु या कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे आज शहरातील अनेक भागातील हातपंप,विंधन विहिरींची दुरुस्ती न झाल्याने ते बंदवस्थेत आहेत.त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकण्याची वेळ येऊ लागली आहे.गोंदिया नगरपरिषदेचे नगराध्यक्ष ज्या भागात राहतात त्या सिव्हीललाईनला लागून असलेल्या अनेक भागात हातपंप नादुुरुस्त असल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असतानाही त्या कंत्राटदारावर नगरपरिषद मेहरबान का अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.