कृषी सभापतीच्या हस्ते नाला सरळीकरण व खोलीकरणाचे भूमिपूजन

0
18

गोंदिया,दि.१०ः-जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागातंर्गत पिडंकेपार जिल्हा परिषद मतदारसंघातील ढाकणी येथे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतंर्गत नाला सरळीकरण व खोलीकरण कामाचे भूमिपूजन कृषी व पशुसंवर्धन सभापती शैलजा कमलेश सोनवाने यांच्या हस्ते करण्यात आले.जलयुक्त शिवार कार्यक्रमातंर्गत पाण्याचे स्त्रोत बळकट करण्यासाठी विविध काम हाती घेण्यात आले आहे.सोबतच मजुरांना १०० दिवस काम उपलब्ध व्हावे यासाठी सरकार प्रयत्न करीत असल्याचे विचार यावेळी सभापती शैलजा सोनवाने यांनी व्यक्त केले.यावेळी प्रामुख्यांने ढाकणीचे सरपंच नामदेव शहारे,ग्रामपंचायत सदस्य इंदुबाई क्षिरसागर,पंचशिला बागडे,अनुराधा लिल्हारे,गणेश कोंबडीबुरे,हंसराज लिल्हारे,सचिन पालांदूुरकर,ग्रामसेवक वाय.सी.पटले यांच्यासह कामावरील १७२ मजुर उपस्थित होते.